सर्वात वर

Nashik-‘पोडेक्स टॉक’: १० डिसेंबरला होणार नवीन संकल्पनेचा शुभारंभ

एनसी देशपांडे

एका सर्वस्वी नवीन संकल्पनेचा शुभारंभ आणि संवाद माध्यमातील झेप, नाशिककरांचे नाव जगात दुमदुमणार….

नाशिकस्थित ‘ख्यातनाम लेखिका पूजा प्रसून’ यांनी लेखनातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवतांनाच ‘पॉडकास्ट’ च्या माध्यमातून आपले विचार जगभरात पोहोचवून, याही क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलाय.

सोबतच नाशिकमधील विविध विषयातील ‘तज्ञ, समाजप्रिय आणि समाजशिल’ अशा व्यक्तींचे ‘विचार,कार्य आणि उद्बोधन’ समाजासाठी मांडलंय. अनेक महत्वाच्या सामाजिक विषयांवर विश्वासार्ह माहिती, विचार, मंथन, रंजन, साहित्य-कला-संस्कृती अंतर्गत कथा कादंबऱ्या कविता नाटक यांचं वाचन, मिमांसा..इत्यादी, असा वैयक्तिक ‘श्रवण संवाद’ साधला गेलाय. ज्यामध्ये प्रामुख्याने क्षण ओथंबलेले(श्री.प्रदीप वेलणकर), फायटिंग फिट फ्रायडेज(डॉ.मिलिंद पिंप्रिकर), वेट पिलोज(कु. पूजा प्रसून आणि श्री विवेक बापट), कविता एक आकलन(श्री.सीएल कुलकर्णी) आणि टॉप लाईट(एनसी देशपांडे) या शोजचा समावेश आहे. ज्यामुळे त्या व्यक्तींनाही संपुर्ण जगाशी संवाद साधता येईल, त्याची ओळख निर्माण होईल आणि समाजालाही त्यांच्याशी निगडीत विषयावर ज्ञान प्राप्त होईल, हा उद्देश.

ज्यामुळे जगभरातून VTL Podcastला पसंती लाभली असून आजवरच्या प्रवासात या पोर्टलचे लाखो श्रोते निर्माण झाले आहेत. नवीन संकल्पना आणि नवीनच पोर्टल असूनही उत्तरोत्तर व्हीटीएलला लाभणारा प्रतिसाद ‘पूजा प्रसून’ यांचा उत्साह वाढवतो आहे. ‘नाशिक आणि नाशिककर’ यांच्यातील कलागुणांना उचित प्रसिद्धी आणि सन्मान देण्याच्या उद्देशाने ‘पोडेक्स टॉक’ या एका सर्वस्वी नवीन संकल्पनेचा शुभारंभ येत्या गुरुवारी, म्हणजेच १० डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्यामध्ये नाशिक शहरातील ‘ यशस्वी, भूषणावह आणि अभिमानास्पद’ अशा एक दोन नव्हे तर तब्बल छत्तीस व्यक्तींचे ‘विचार, अनुभव आणि एकुणात वाटचाल’ याचा लेखाजोगा त्यांच्याच शब्दात ऐकण्याचे भाग्य सर्व श्रोत्यांना लाभणार आहे. ज्यामुये मानवी जीवन, आरोग्य, तंदुरुस्ती, शेती, सौंदर्य, शिक्षण, व्यवसाय, साहित्य, समाजस्वास्थ्य, करमणूक, वैद्यकीय आणि समाजकारण अशा अनेक विषयांवर प्रबोधनात्मक चर्चा घडून येईल.

ज्यामध्ये सर्वश्री अशोक कटारिया, डॉ.रविंद्र कुमार सिंगल(IPS), सौ.लीना बनसोड, सौ.संगीता धायगुडे, डॉ.केशव नांदुरकर, डॉ.मिलिंद पिंप्रिकर, डॉ.श्वेता भिडे, डॉ.पल्लवी आलाप देशपांडे, डॉ.मृणालिनी केळकर, डॉ.मुस्तफा टोपीवाला, डॉ.मनीषा रौंदळ, श्री.विश्वास ठाकूर, श्री.विनायक रानडे, श्री.सचिन उषा विलास जोशी, श्री. लक्ष्मण सावजी, श्री.सिद्धार्थ राजघरीया, श्री.विलास शिंदे, श्री.किरण चव्हाण, श्री.दत्ता कदम, श्री.सचिन शिंदे, श्री.प्राजक्त देशमुख, श्री.मिलिंद कुलकर्णी, श्री.स्वानंद बेदरकर, श्री.राजेश पंडित, सौ.राखी टकले, सौ.मोनालिसा जैन, सौ.शरण्या शेट्टी, सौ.अश्विनी देशपांडे, सौ.रागीणी कामतीकर, सौ.विजयालक्ष्मी मणेरीकर, सौ.सुनिता मोडक, सौ.सोनल दगडे, सौ.पूनम आचार्य, सौ.श्रुती भुतडा, सौ.सोनाली दाबक आणि सौ.गीता बागुल यांचा समावेश आहे.

नवनवीन संवाद माध्यमाचा उचित उपयोग करून ‘नाशिक शहर आणि नाशिककर’ यांचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचे श्रेय्य ‘पूजा प्रसून’ यांना जातं. नाशिक शहरातील उत्साहवर्धक, पोषक वातावरण, नाशिककरांचा उस्फुर्त सहभाग आणि सहकार्य, हीच खरी उर्जा असल्याची बाब आपल्या नाशिक शहरासाठी अत्यंत अभिमानाची आणि महत्वाची ठरते.