सर्वात वर

नाशिकचे प्रसिद्ध क्रिडा शिक्षक प्रशांत भाबड यांचे निधन

नाशिक- नाशिकच्या क्रिडा क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु.स.रुगटा या शाळेचे सुप्रसिद्ध क्रिडा शिक्षक प्रशांत शांताराम भाबड (Prashant Bhabad) यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले.अत्यंत तळमळीचा क्रिडा शिक्षक आणि मनमिळाऊ मित्र गमावल्याची भावना आज नाशिकच्या क्रिडा व सामाजिक क्षेत्रात निर्माण झाली आहे. 

गेल्या २३ दिवसापासून ते कोरोनाशी झुंज देत होते.  त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.कब्बडी क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान होते.तसेच क्रिडा क्षेत्रातील अनेक खेळाडू आणि विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक होते.नाशिक जिल्हा कब्बडी असोशिएशन, कब्बडी खेळाचे ते राष्ट्रीय खेळाडूंचे ते प्रशिक्षक होते.प्रशांत भाबड(Prashant Bhabad) यांच्या निधनाने एक सच्चा मार्गदर्शक, मनमिळाऊ नेतृत्व गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. 

श्रद्धांजली !

नाशिकमधील प्रख्यात क्रीडा प्रशिक्षक प्रशांत भाबड यांचे दुःखद निधन झाले. कब्बडी क्षेत्रात त्यांचे विशेष योगदान होते.नाशिकच्या क्रिडा क्षेत्रातील अनेक खेळाडू आणि विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक होते. नाशिक जिल्हा कब्बडी असोशिएशनमध्ये त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. कब्बडी खेळातील राष्ट्रीय खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले होते. नाशिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. मनमिळावू स्वभावाचे असलेले प्रशांत भाबड यांच्या निधनाने नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मी व माझे कुटुंबीय भाबड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.


भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ,

मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य,तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.