सर्वात वर

New Cronavirus : ब्रिटनकडून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी

नवी दिल्ली : अनेक महिन्यात पासून संपूर्ण जग कोरोनाच्या विषाणूशी लढत असतांना ब्रिटन मध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (New Corona coronavirus)आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा विषाणू प्रचंड वेगाने पसरत असल्याने सर्व देश आता सतर्क झाले आहे. भारत सरकारने याची गंभीर दखल घेतली असून ब्रिटन आणि भारतातील विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून हि बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 

ब्रिटन मध्ये आढळलेल्या या नवीन विषाणूचे (New Corona coronavirus) जवळपास १००० रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार हा नवा विषाणू वेगाने जरी पसरत असला तरी आधीच्या विषाणूच्या तुलनेत कमी संहारक आहे. अशी माहिती ब्रिटिश वैज्ञानिकांनी दिली आहे. 

घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. कि ब्रिटन मधील मिळालेल्या नव्या प्रकारच्या विषाणू बाबत भारत सरकार सतर्क असून नागरीकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना विषाणूशी लढण्यासाठीच्या सर्व उपाय योजना सरकारने केल्या आहेत असे हि ते म्हणाले डब्लूएचओ ब्रिटन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून नवीन विषाणू (New Corona coronavirus) संदर्भातील माहिती घेण्याचे काम सुरु आहे या बाबत सुरु असलेल्या संशोधनाची माहिती ब्रिटनचे अधिकारी डब्लूएचओ ला  देत आहेत. यासंदर्भात आम्ही लोकांना अद्यायावत करत आहोत. असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.