सर्वात वर

शेअर बाजारात नवा उच्चांक

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

काल अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी तेथील मिडल क्लास यांना सहारा मिळावा म्हणून US डॉलर सहा ट्रिल्लीयन  इतका बजेट प्रपोज केला आहे, त्याचाच परिणाम तेथे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारांमध्ये (Todays Stock Market) बघायला मिळाला.याच संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार सुद्धा सकारात्मक ओपन  झाला, 

काही काळ बाजार अस्थिर स्वरुपात राहिला परंतु बाजारातील दिग्गज  शेअर रिलायन्स मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी बघायला मिळाली त्याचाच परिणाम म्हणून आज हा समभाग सहा टक्के इतका वधारला त्यामुळे बाजाराने आज एक नवीन उच्चांक गाठला व बाजार बंद (Todays Stock Market) झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक SENSEX  307 अंकांनी वधारून 51423 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 98 अंकांनी वधारून 15435 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग समभाग मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा मात्र 46 अंकांनी वधारून 35141 या पातळीवर बंद झाला.

आज बाजारातील (Todays Stock Market) ह्या तेजीचे सर्व श्रेय रिलायन्स आणि ग्रसिम या बाजारातील सर्वात जुन्या असलेल्या समभागांना जाते कारण बऱ्याच महिन्यांपासून रिलायन्स मध्ये अशा प्रकारची खरेदी बघायला मिळाली नव्हती त्यामुळेच  बाजाराने आज नवा उच्चांक गाठला आहे.जसे आम्ही मागील काही लेखांमध्ये उल्लेख करत आलेलो आहोत की ,बाजार जरी अस्थिर व काही काळ वर खाली दिसत असला तरी, बाजाराला कोणते ना कोणते क्षेत्र सांभाळण्याचा प्रयत्न करत  आहे ,कारण बाजारामध्ये एक तर्फी खरेदी अथवा विक्री दिसत नाही ,त्याच बरोबर एप्रिल आणि मे मध्ये तसे बघितले तर विदेशी वित्तीय संस्था यांच्याकडून विक्री बघायला मिळालेली आहे,

बाजारातील तज्ञ सांगत आहेत की सध्या वातावरण जरी भीती चे असले तरी प्रत्यक्ष वातावरण हे करोनाला हरवतांना दिसत आहे तर दुसरीकडे लसीकरणाला वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे ,त्याच बरोबर केंद्र सरकारकडून  मोठ्या प्रोत्साहनपर पॅकेज ची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे या सर्वांचा परिणाम बाजारावर सात सकारात्मक दिसू शकतो.

Todays Stock Market

NIFTY १५४३५ + ९८

SENSEX ५१४२३ + ३०७ 

BANK NIFTY ३५१४१ + ४६ 

Todays Stock Market -आज निफ्टी वधारलेला शेअर्स  

RELIANCE २०९४ + ६%

ADANIPORTS ७७७ + ४%

GRASIM १४६५ + ३%

M&M ८४७ + २%

COALINDIA १४७ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

SUNPHARMA ६७३ – ४%

SHREECEM २७५९९ – २%

BAJAFINSV ११७२५ – १%

DR.REDDY ५२०० – १%

BAJFINANCE ५६१६ – १%

यु एस डी आय  एन आर $ ७२.८०००

सोने १० ग्रॅम           ४८४०८.००

चांदी १ किलो         ७१२४५.००

क्रूड ऑईल             ४८८२.००

विश्वनाथ बोदडे,नाशिक 

संपर्क – 8888280555