सर्वात वर

महाराष्ट्रात लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर

 २२ एप्रिल पासून ८ रात्री वाजेपासून निर्बंध लागू 

मुंबई-राज्य सरकारने ब्रेक दि चेन च्या माध्यमातून महाराष्ट्रात कडक निर्बंधाची (lockdown) नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज नवे निर्बंध जाहीर केले आहे. ब्रेक द चेनच्या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले असून, २२ एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून १ मे  पर्यंत हे कडक निर्बंध लागू होणार आहेत.

नवी नियमावली नेमकी काय आहे ?
लोकल रेल्वे प्रवास केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे

सरकारी कार्यालयात फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम होणार

खासगी कार्यालयातही ५ कर्मचारी किंवा अधिकाधिक १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक

लग्नासाठी एका हॉलमध्ये २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी, २ तासांची वेळमर्यादा, नियमांचं उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंड

खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी, नियमांचं उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड

अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.  

लसीकरण मात्र सुरु राहणार आहे. लसीकरणासाठी ज्यांना जायचे आहे त्यांनी आपले अधिकृत पत्र  दाखवल्यास त्यांना लसीकरण केंद्रावर जाता येणार आहे. 


सविस्तर बातमी लवकरच