सर्वात वर

नाशिक मनपा शाळेचा नाविन्यपूर्ण ऑनलाईन उपक्रम अधिकारी आपल्या भेटीला..!!

कोरोनाच्या काळात शाळा बंद.. पण शिक्षण सुरूच ..   

नाशिक – भारतात २०२० मध्ये आपल्या भारतात आलेल्या कोरोना संकटकाळात  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून शाळा बंद कराव्या लागल्या.  परंतु शाळा ((NMC School))बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र चालू राहावे म्हणून अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास देणे सुरू केले.  परंतु यावेळी ऑनलाइन अभ्यासातही नाविन्यता असावी व ते अधिक दर्जेदार व्हावे या उद्देशाने मनपा शाळा क्रमांक १८ (NMC School) आनंदवल्ली येथील शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांनी आपल्या शाळेतील (NMC School) विद्यार्थ्यांसाठी खास काही ऑनलाईन उपक्रम राबविले.  आपल्या शाळेतील ज्या मुलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत अशा विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप त्यांनी बनवले या विद्यार्थ्यांना त्यांनी झूम व गुगल द्वारे मीटिंग कशी करायची हे शिकविले व त्यानुसार ते त्या रोजच विद्यार्थ्यांना गुगल मीटिंग द्वारे ऑनलाईन तास घेऊ लागल्या.  त्यातही विद्यार्थ्यांना मनोरंजनातून ज्ञान मिळावे व ऑनलाईन शिक्षण कंटाळवाणे न  होता त्याच्यातलं सातत्य टिकून राहावे म्हणून श्रीमती बच्छाव यांनी या शैक्षणिक वर्षात विविध ऑनलाईन उपक्रम राबविले. 

त्यांच्या उपक्रमा मधील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे अधिकारी आपल्या भेटीला. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत  त्या स्पर्धा परीक्षा जसे की एमपीएससी यूपीएससी देऊन मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या प्रथम वर्ग श्रेणीतील  अधिकाऱ्यांना आपल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी आमंत्रित करतात व हे अधिकारी या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या शंका प्रश्नांचे समाधान करतात. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीच करतात. विद्यार्थी आणि अधिकारी यांच्यामध्ये मनमोकळा संवाद घडून येतो.अधिकारी होण्यासाठी  कोणत्या परीक्षा द्यायच्या, कसा अभ्यास करावा याचे संपूर्ण मार्गदर्शन अधिकाऱ्यांमार्फत एवढ्या कमी वयात या विद्यार्थ्यांना मिळत आहे ही खरोखर कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. 

तसेच हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह असल्यामुळे नाशिक मनपातील विद्यार्थ्यांबरोबरच जिल्ह्यातील  जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी  अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. आजवर त्यांच्या या उपक्रमात मोठमोठ्या पदावर कार्य करणारे अधिकारी उदाहरणार्थ  शिक्षण सहसंचालक नाशिक पुष्पावती पाटील , प्राचार्या मा. रत्नप्रभा भालेराव , शिक्षणसभापती  संगीता गायकवाड ,नगरससेवक संतोष गायकवाड, महिला व बालकल्याण विभाग उपायुक्त .अर्चना तांबे, नाशिक मनपा शिक्षण विभाग प्रशासनअधिकारी सुनिता धनगर,उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे ,अधिव्याख्याता मा. डॉ. संगिता  महाजन, अधिव्याख्याता ,जगन्नाथ दरंदले सर, एसआरपी मा. अशोक चव्हाण सर, गणितमित्र वाल्मीक चव्हाण, फौंडेशन समन्वयक मा.राजकिरण चव्हाण, RTO इन्स्पेक्टर  एकनाथ ठाणगे, NASA सल्लागार अपूर्वा जाखडी यांनी  विद्यार्थ्यांशी  प्रेरणादायी संवाद साधत  विद्यार्थ्यांचे व  उपक्रमाचे कौतुकही केले आहे. 

भविष्यात हे विद्यार्थी नक्कीच अधिकारी होतील असा विश्वास देऊन यासाठी लागणारी कुठलीही मदत आम्ही नक्कीच करू असा शब्दही दिला आहे. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी ठरला असून यामुळे  विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला व  भविष्यात त्यांनी अधिकारी होऊन देश सेवा करण्याचे  आजच निश्चित करून टाकले आहे.

त्याचबरोबर  राबवीत असलेला अजून एक प्रशंसनीय ऑनलाईन उपक्रम म्हणजे साहित्यिक आपल्या भेटीला. व ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल नाहीत अशा विध्यार्थ्यांच्या मनात आपल्याकडे मोबाइल नसल्यामुळे आपले शिक्षण बंद झाले असा न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पुस्तके आपल्या भेटीला हे उपक्रम ही त्या राबवित आहेत.   

अशा प्रकारे जेथे कोरोनाच्या भीतीने सगळे जग थांबलेआहे तेथे विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा त्यांच्या संपर्कात राहता यावे व त्यांना भविष्यात उपयुक्त  होईल असे  शिक्षण या काळात मिळावे यासाठी श्रीमती बच्छाव या प्रयत्नशील आहेत. सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमात श्रीमती बच्छाव यांना नासिक मनपा आयुक्त  कैलास जाधव, नाशिक मनपा शिक्षण मंडळ शिक्षणाधिकारी श्रीमती सुनीता धनगर,केंद्रमुख्याध्यापक श्री कैलास ठाकरे यांचे मार्गदर्शन असून मनपा शिक्षिका वैशाली भामरे,पूनम भामरे,व शिक्षक वृंद आनंदवल्ली शाळा, तसेच मनपा व जि. प. शिक्षकांचे  सहकार्य मिळत आहे. कोरोना  ही  समस्या न मानता संधी बनविणाऱ्या अशा  विद्यार्थ्यांसाठी (NMC School) प्रेरणादायी  ठरणार्‍या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.