सर्वात वर

“ऑक्सिजन एक्सप्रेस” मधून नाशिकरोड रेल्वे स्थानकात उतरणार ७ ऑक्सिजन टँकर

“ऑक्सिजन एक्सप्रेस” उद्या सकाळी १० वाजता नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचणार

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने  कळंबोली स्थानकातून ७ रिकामे ऑक्सिजन टँकर घेऊन गेलेली “ऑक्सिजन एक्सप्रेस”(Oxygen Express) विशाखापट्टणमला गेली होती. त्या रेल्वेनं गुरुवारी रात्रीच भरलेल्या ऑक्सिजन टँकरसह महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे.आज रात्री ही एक्सप्रेस नागपूर मध्ये दाखल होणार असून उद्या (२४ एप्रिल )सकाळी १० वाजता ही  “ऑक्सिजन एक्सप्रेस”नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे. 

दरम्यान नाशिकरोडच्या मालधक्क्यावर या “ऑक्सिजन एक्सप्रेसचे”(Oxygen Express) आगमन होणार असून हे सात टँकर उतरविण्यात येणार आहे. या एक्सप्रेसमधून ७ टँकर म्हणजे जवळपास १०० टनाहून अधिक ऑक्सिजन राज्याला मिळाला आहे. त्यानंतर या ऑक्सिजनचे वाटप कसे करायचे याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.राज्यातला मिळालेल्या या ऑक्सिजनमुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळणार आहे.  

विशाखापट्टणमहून खास मागवलेल्या ऑक्सिजनची आवश्यकता नाशिक मुंबई पुणे औरंगाबाद नगरला सर्वाधिक आहे. या ठिकाणी कंत्राटदार नेमण्यात आला असून त्या माध्यमातून ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे त्याठिकाणी हे ऑक्सिजन टँकर पोहचवले जाणार आहेत.नाशिक मध्ये रुग्णांची संख्या अधिक असल्याने नाशिकला किती ऑक्सिजन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.