सर्वात वर

ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकरोडला दाखल : ४ टँकर उतरवले

नाशिक – विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस (Oxygen Express)आज सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानकात दाखल झाली.येथील मालधक्क्यावर या ऑक्सिजन एक्सप्रेस मधून ४ टँकर उतरविण्यात आले.विशाखापट्टणम हुन ऑक्सिजनचे ७ टँकर घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस काल रात्री नागपूरला पोहचली होती. नागपूरला ३ टँकर उतरविण्यात आले उर्वरित ४ टँकर नाशिकरोड रेल्वे स्थानकात आज उतरविण्यात आले आहेत. 

या ऑक्सिजन एक्सप्रेसच्या ((Oxygen Express)) माध्यमातून नाशिकला २५ के.एल.चे  २ टँकर नाशिकला मिळाले असून उर्वरित २ टँकर अहमदनगरला मिळणार आहे. या टँकर मुळे मिळणारा ऑक्सिजन हा नाशिकचा तुटवडा भरून काढण्यासाठी मदत करणार आहे.  

२५ के.एल. च्या दोन ऑक्सिजन टँकरमुळे एकूण ५० मेट्रिक टन प्राप्त होणारा ऑक्सिजन एकाच दिवसात वापरून न संपवता, ज्याठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प आहेत, तेथे या ऑक्सिजनचा काही प्रमाणात साठा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. जेणेकरून अतिआवश्यक समयी साठवून ठेवण्यात आलेल्या या ऑक्सिजनचा वापर करणे शक्य होईल.अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.