सर्वात वर

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे निधन

नवी दिल्ली – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा (Rajan Mishra) यांचे कोरोनाने आज दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते ते काही दिवसापासून कोरोनाने आजरी होते. त्यांना हृदयविकार सुद्धा होता.आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडली, त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

आज सकाळी त्याची तब्बेत बिघडल्या नंतर त्यांना रुग्णालयात बेड उपलब्ध झाला नाही त्यामुळे काहीजणांनी ट्विटर वर पोस्ट टाकून त्याच्यासाठी बेड ची मदत मागितली.आयएएस अधिकारी संजीव गुप्ता यांनी प्रयत्न करून दिल्लीच्या एका रुणालयात त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था केली.डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून हि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. 

पंडित राजन मिश्रा (Rajan Mishra) यांनी कला क्षेत्रातील कामगिरी बद्दल २००७ साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.