सर्वात वर

पेठे विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक वि.भा.देशपांडे यांचे निधन

नाशिक – नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य पेठे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक  विद्यार्थी प्रिय शिक्षक वि.भा.देशपांडे (VB Deshpande)यांचे आज सकाळी  कोरोना मुळे निधन झाले आहे.ते ७६ वर्षांचे होते. 

काही दिवसापूर्वीच सरांच्या पत्नीचे आणि थोरल्या मुलाचे कोरोनामुळे निधन झाले.कोरोनामुळे एक हसते खेळते कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

वि.भा.देशपांडे (VB Deshpande) पेठे विद्यालयाचे (Pethe Vidyalaya) माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. विज्ञान आणि गणिताचे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे गणित आणि विज्ञान हे विषय ते मनापासून शिकवित असत. सरांचे नीटनेटके राहाणे हा विषय त्याकाळी केवळ मुलांच्यातच नाही तर इतर शिक्षकांमध्येही चर्चिला जात असे. सरांचे मधाळ बोलणे,शिकवण्याची पद्धत विद्यार्थीप्रिय होती गणित आणि विज्ञान या विषयांचे उत्तम शिक्षक ही सरांची ओळख कधीही पुसली जाणार नाही.

वि.भा.देशपांडे सर (VB Deshpande) यांनी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य पद अनेक वर्षे त्यांनी भूषविले. संस्थेच्या डी.एस.कोठारी कन्या शाळेचे शाळा समिती अध्यक्ष पद उत्तम रीतीने सांभाळले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.