सर्वात वर

पेट्रोल – डिझेल मध्ये पुन्हा दर वाढ : नाशिकमध्ये काय आहेत पेट्रोल – डिझेल चे दर जाणून घ्या

नाशिक : देशात इंधनाचे दरसातत्याने वाढत आहेत, एक दिवसाच्या विश्रांती नंतर पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा दर वाढ केल्यामुळे परिणामी बहुतांश शहरात किंमती सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या (Petrol-Diesel Price Today) आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे  दर प्रति लीटर १०१.७६ रुपये आहेत तर नाशिक मध्ये हे दर १०२.१८ रुपये  प्रति लीटर झाले असून  डिझेल चे दर ९२.८४ रुपये प्रति लीटर झाले आहेत काही शहरात पेट्रोलने शंभरीचा टप्पा पार केला आहे.आज सरकारी तेल कंपन्यांनी एका दिवसानंतर पुन्हा एकदा इंधनाच्या दरात  वाढ केली आहे. आज पेट्रोलचे दर (Petrol-Diesel Price Today) २५ पैसे प्रति लीटर तर डिझेलचेही दर प्रति लीटर २५ पैशांनी वाढले आहेत.या दर वाढीनंतर ग्राहकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. 

सोमवारी पेट्रोलचे दर २४-२८ पैसे प्रति लीटरने वधारले होते तर डिझेलच्या दरात २६-२८ पैसे प्रति लीटरने वाढ झाली होती. मे महिन्यात सातत्याने इंधनाचे दर वाढले आहेत. गेल्या २१ दिवसात पेट्रोलचे दर ४.९९ रुपये प्रति लीटरने महागलं आहे. तर डिझेलचे भाव ५.४४ रुपये प्रति लीटरने महागले आहेत.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.  

जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे इंधनाचा भाव (Petrol-Diesel Price Today) 

दिल्ली – ९५.५६ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८६.४७ रुपये प्रति लीटर

मुंबई – १०१.७६ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९३.८५ रुपये प्रति लीटर

 कोलकाता – ९५.५२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८९.३२ रुपये प्रति लीटर

चेन्‍नई – ९६.९४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.१५ रुपये प्रति लीटर