सर्वात वर

पोहे कटलेट

शीतल पराग जोशी

पोहे कटलेट मुलांना दयायला खूप छान स्नॅक्स आहे. या रेसिपी मुळे सगळ्या भाज्या पण पोटात जातात. आणि आपल्याला पण मित्र परिवार एकत्र जमला की खायला छान वाटते. बाहेरचे सामोसे, कचोरी,आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार करता येते.आहे के नाही सोपे पोहे कटलेट(Pohe Cutlet). मग करून बघताय ना

Pohe Cutlet

साहित्य : 2 वाटी जाडे पोहे, 2 बटाटे, 1 सिमला मिरची, 1 कांदा,   2 हिरवी मिरची, 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1टीस्पून चाट मसाला, 2 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला , 1 टीस्पून हिंग, चवी नुसार मीठ, कोथिंबीर, तेल, कॉर्न फ्लोअर,

कृती : जाडे पोहे भिजवून घ्यावेत. नंतर 2 बटाटे  उकडवून घ्यावेत. पोहे  भिजले की त्यात बटाटा किसून घालावा. पोहे आणि बटाटा मिश्रण छान मळून घ्यावे. त्यात कांदा, सिमला मिरची, बारीक चिरून घालावी. हवे असल्यास तुम्ही गाजर, कोबी, बीन्स ही घालू शकतात. आता कैरी पण येतेय. ती देखील किसून घालू शकतात. तिखट, हळद, कांदा लसूण मसाला घालावा.चवीनुसार मीठ घालावे. त्यात आले, लसूण, मिरची पेस्ट घालावी. एका मिरचीचे बारीक तुकडे घालावे. ते दाताखाली आले कीं छान लागतात.धने, जिरे, पावडर घालावी. चाट मसाला घालावा. कोथिंबीर टाकून मळून घ्यावे.  पाणी टाकू नये.

पोहे चांगले भिजलेले असतील तर पाण्याची गरज नाही. ह्या मिश्रणाचे  छोटे गोळे करून त्याला हार्ट शेप अथवा गोल आकार देऊन पोहे कटलेट (Pohe Cutlet) करू शकतात.  आवश्यकता असेल तर कॉर्न फ्लोअर कोरडे एका ताटलीत घेऊन त्यामध्ये आपण हे कटलेट घोळवू शकतो. मग तेल  तापले की त्यात हे पोहे कटलेट (Pohe Cutlet) तळून घ्यावे.  डाएट consious असाल तर shallow फ्राय पण करू शकतात. टोमॅटो सॉस बरोबर खूप छान लागतात. अथवा तुम्ही हिरवी चटणी बरोबर पण खाऊ शकतात.  

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी

संपर्क- 9423970332