सर्वात वर

आठवड्याची सकारात्मक सुरुवात : SENSEX १९४ अंकांनी वधारला

आंतरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे आज आठवड्याच्या  पाहिल्या दिवशी भारतीय शेअर  बाजाराचा निर्देशांक 350 अंकांनी आणि राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टी 95 अंकांनी सकारात्मक  उघडले ,काही काळ बाजार अस्थिर ( VOLATILE) स्वरूपात राहिला त्यानंतर बाजारात नफा वसुली दिसली.आज सकाळपासूनच NBFC कंपन्यांच्या  शेअरमध्ये चांगली मागणी होती त्यामुळे बाजार त्यामुळेच बाजाराने आज दुसऱ्या सत्रा मध्ये रेकॉर्ड हाय क्रॉस केला होता. परंतु त्यानंतर काही प्रमाणात नफा वसुली बघायला मिळाली त्यामुळे मुंबई शेअर बाजराच्या तीस समभागांचा निर्देशांक 194 अंकांनी वधारून 44077 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 67 अंकांनी सकारात्मक बंद होऊन 12926  ह्या पातळीवर स्थिरावला

निफ्टी बँक मध्ये आज सकाळपासून नफा वसुलीदिसत होती त्यामुळे निफ्टी बंद 212 अंकांनी घसरून 29026 ह्या पातळीवर बंद झाला.बाजारच्या लांबीचा  विचार केला तर 1636 समभाग सकारात्मक होते तर  1133 समभाग नकारात्मक होते आणि 178 शेअर्समध्ये कोणताही बदल बघायला मिळला नाही. आजच्या सत्रात PSU , IT आणि फार्मा शेअरमध्ये मागणी होती तर BANKING आणि FINANCE शेअरमध्ये विक्री बघायला मिळली.

बाजारातील जाणकार सांगत आहेत की, सध्या बाजार अशा  वळणावर आहे की कोत्याही दिशेने टर्न होऊ शकतो कारण ऐकी कडे बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे त्यामुळे बाजार उंच स्तरावर पोहचला आहे तर दुसरी कडे करोनाची दुसरी लाट डोके काढते की काय अशी शंका वर्तवली जात आहे , जर पुन्हा लॉक डाउन घोषित झाले तर त्याचा परीणाम बाजारावर नकारात्मक दिसेल आणि जर करोनावर लस लवकर उपलब्ध झाली तर त्याचे सकारात्मक परीणाम हि  बाजारात उमटतील असे  जाणकारांचे मत आहे. . 

NIFTY १२९२६ + ६७

SENSEX  ४४०७७ + १९४. ९०

BANK NIFTY २९०२६ – २१२

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

O N G C ७६.४ + ७% 

INDUSINBK ८४२ + ४% 

GAIL १०१ + ४%

DR. REDDY ४८३५ + ४% 

INFY ११३८.५० + ३%


आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

HDFC २२५३ – ४%

ICICI BANK ४६८ – ३%

AXIS BANK ५९७ – २%

SBI LIFE ८३१ – २%

TITAN १३४१ – २%

यु एस डी  आई एन आर $ ७४.०७००

सोने १० ग्रॅम        ५०१७०.००

चांदी १ किलो       ६१४००.००

क्रूड ऑईल           ३१७९.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे


विश्वनाथ बोदडे,नाशिक Mobile-8888280555