सर्वात वर

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये दाखल

पुणे – पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टीट्यूटमध्ये दाखल झाले आहेत.मोदींनी सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली.

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये येऊन कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.या भेटीनंतर पंतप्रधान माध्यम प्रतिनिधींशी काय बोलता या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.