सर्वात वर

पुनर्नवा(वसूची भाजी)-(आहार मालिका क्र – २२)

डॉ. राहुल रमेश चौधरी

भारतात गुणकारी भाज्या या नेहमीच उपेक्षित राहिल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे वसूची भाजी (Vasuchi Bhaji) यालाच वसूची भाजी,घेंटुळी,खापडी,पांढरी वसू असे देखील म्हणतात.ही भाजी पावसाळ्यात जास्त मिळते.पुनर्नवा फुलानुसार म्हणजे फुलाच्या रंगानुरुप पांढरी,निळी,लाल या ३ प्रकारची आहे.त्यापैकी पांढरी भाजी करीता वापरली जाते. अश्या या वेल प्रकारातील भाजीची आज माहीती बघूयात.

पुनर्नवा(वसूची भाजी-Vasuchi Bhaji) आरोग्यास फायदे    

१.शरीरात घाम कमी येत असून त्वचा कोरडी पडून त्वचेचा रंग बदलत असून त्वचेचे केस गळत असल्यास पुनर्नवाची(Vasuchi Bhaji) भाजी खावी या भाजीचा रस सर्वांगावर लावावा.

२.पाय मुरगळणे,मार लागणे,सूजणे अश्या वेळेला सूज कमी करून वेदना कमी करण्याकरीता वसूच्या भाजीचा रस मधातून घ्यावा.पानांचा काढा करावा व त्यात जाड कापड भिजवून त्याने शेक द्यावा.

३.यकृताची कार्यशक्ती कमकुवत होणे,भूक न लागणे,अन्नाचे पचन न होणे व सप्तधातु चे पोषण न झाल्याने शरीर वर्ण पांढरा फिक्कट पडणे,अशक्तपणा जाणवणे,हात पाय थरथर कापणे,चेहऱ्यास सूज येणे अश्या वेळेला वसूची भाजी आहारात ठेवावी,त्याचे सूप घ्यावे.

४.लघवीस कमी होणे,अंगावर सूज येणे,चक्कर येणे,पोटात गॅस पकडणे, जुलाब होणे,जीव घाबरणे,त्वचा फिक्कट पडणे अश्या परिस्थितीत वसूची भाजी मीठ न घालता खावी,किंवा भाजीचा रस धन्याच्या काढ्यातून घ्यावा याने हा त्रास कमी होतो.

५.छातीत जड पणाअ जाणवणे,झोप येणे,आळस येणे,पायावर सूज येणे,लघवीस अनियमीत होणे-कमी होणे,चालताना जिने चढताना दम लागणे अश्या रुग्णांनी वसूच्या भाजीचा रस तुळस व आल्याच्या रसासह सेवन करावा.याने बरे वाट्ते व त्रास कमी होतो.

६.कावीळ झाल्यास वसूच्या भाजीचा रस नियमाने घ्यावा त्याने कावीळ कमी होते व यकृताची अशक्तता दूर होते.

७.वसूच्या भाजीचे किंवा वाळलेल्या पानांचे चूर्ण नियमीत सेवन केल्यास यकृत,मूत्रपिंड,ह्रद्य हे महत्वाचे अवयव सुस्थितीत राहतात त्यांचे बळ वाढते.

८.वसूच्या भाजीच्या मूळाचे अंजन डोळ्यांच्या तक्रारीकरीता हितकर ठरते.

सावधान.!!

१.वरील सर्व प्रयोग आयुर्वेद तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच करावे.

२.वरील प्रयोगाने बरे न वाट्ल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

३.यकृत ह्रद्य व मूत्रपिंड या संदर्भातील तक्रारी असल्या तर वसूच्या भाजीचा (Vasuchi Bhaji) प्रयोग तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने व्यवस्थित सर्व तपासण्या करून करावा

४.वसूची भाजी नियमीत खाण्यास हरकत नाही मात्र मूळांचा वापर सल्ल्याशिवाय करू नये.

५.वसूच्या भाजीच्या औषधी प्रयोगाने काही त्रास झाल्यास तज्ञ वैद्यांना संपर्क करावा.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०