सर्वात वर

राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र : महाराष्ट्रासाठी केल्या पाच प्रमुख मागण्या

मुंबई – महाराष्ट्रात आज (१४ एप्रिल२०२१) रात्री ८ पासून ते १ मे सकाळी ७ वाजे पर्यंत १५ दिवसाची संचारबंदी जाहीर झाली आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढते आहे. तर दुसरीकडे लसीचा तुटवडा जाणवतो आहे.राज्यात आरोग्य यंत्रणा कमी पडते आहे. महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक झाली असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पत्र लिहून राज ठाकरेनी पंतप्रधानांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

देशात महाराष्ट्रला करोना साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवानं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती अधिकच  बिकट झाली आहे. करोनाची लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही,’ असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पत्रात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाला रोखायचे असेल तर सर्व वयोगटातील नागरीकांचे  १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के नागरीकांचे  लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच,” असंही राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी पत्रात म्हटलं आहे.

करोनामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. कोरोनाच्या साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल,” असं राज यांनी म्हटलं आहे.  

राज ठाकरेंनी पंतप्रधानकडे केलेल्या प्रमुख मागण्या


* महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या 

* राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात

* सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी

*लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, आणि

* कोविड रोगाचा उपचार करमअयासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी