सर्वात वर

सुप्रसिद्ध अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

मुंबई – ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे धाकटे बंधू राम तेरी गंगा मैली फेम सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे आज मुंबईत ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. आज सकाळी राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे बंधू रणधीर कपूर यांनी त्यांना चेंबूर येथील इनलॅक्स रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले होते. मात्र उपचारा पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांच्या निधनाने कपूर घराण्यातील  अजून एक स्टार गमावल्याची भावना चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली.

श्रद्धांजली
अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे मुंबईत निधन झाल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. राजीव कपूर हे फक्त अभिनेते नाही तर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. राजीव कपूर यांचा “राम तेरी गंगा मैली” या चित्रपटातला अभिनय नेहमी स्मरणात राहील त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थनाभावपूर्ण श्रद्धांजली…!


छगन भुजबळ

मंत्री,अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य