सर्वात वर

वार्षिक राशिभविष्य जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ (Rashi Bhavishya 2021)

Rashi Bhavishya 2021(वार्षिक राशिभविष्य) – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

मेष: तुम्ही सरळ स्वभावाचे, स्पष्ट वक्ते, कार्यतत्पर, शीघ्रकोपी आहात. यावर्षात कामात सकारात्मक बदल होतील. आर्थिक आवक चांगली राहील. विरोधक पराभूत होतील. वरिष्ठ खुश होतील. कामे मार्गी लागतील. स्वप्ने साकार होऊ लागतील. शक्यतो जामीन राहू नका. मैत्री सांभाळा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मविश्वास वाढेल. पोटाचे विकार संभवतात. मोठी आव्हाने स्वीकारताना योग्य सल्ला घ्या. छोटे प्रवास घडतील.

वृषभ:- तुम्ही सौंदर्याचे भोक्ते, कलाप्रेमी, मृदू स्वभावाचे, संयमी आणि सहनशील आहात. वर्षाची सुरुवात उत्तम होत आहे. व्यवसायात भरभराट होईल. नवनवीन कल्पना सुचतील. जोडधंदा सुरू कराल. काही धाडसी निर्णय घ्याल. मौल्यवान खरेदी होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. उत्तम आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. पोटाचे विकार संभवतात. मैत्रीत व्यवहार मात्र जपून करा.


मिथुन:- तुम्ही निरागस, हळवे, मिश्किल, विनोद आवडणारे, मनमोकळ्या स्वभावाचे आहात. तुमच्या मनात स्पर्धा असते मात्र कपट नसते. या वर्षात प्रगतीचा वेग चांगला राहणार आहे. प्रवासातून नवीन ओळखी होतील आणि त्यातुन लाभ संभवतात. दीर्घकालीन नफ्याची गुंतवणूक कराल. नवनवीन जबाबदाऱ्या वाढतील. शुभ समाचार समजतील. नोकरीत मनासारखी बढती किंवा बदली होईल. मोठ्या खरेदीसाठी काहीशी वाट बघावी लागेल. विक्री व्यवसायात यश मिळेल. विरोधकांचा त्रास जाणवेल.   

कर्क:- तुम्ही अत्यंत हळव्या स्वभावाचे, निर्मळ मनाचे, इतरांना सतत मदतीस तत्पर, रुचकर पदार्थांची आवड असणारे, हौशी व्यक्ती आहात. धार्मिक कार्यात तुम्हाला विशेष रस असतो. घर सजवणे तुम्हाला आवडते. यावर्षीची सुरुवात नवीन वास्तू खरेदीने होऊ शकते. किंवा राहत्या घरात काही महत्वपूर्ण बदल संभवतात. तुमची लोकप्रियता वाढत राहील. त्यामुळे मत्सरग्रस्त शत्रूचा त्रास जाणवेल. मात्र त्यांचा बंदोबस्त होईल. अनुकूल राहू तुम्हाला भरभरून यश देईल. अचानक धनलाभाचा अनेक योग येतील.    


सिंह:- तुम्ही अत्यंत बुद्धिमान, तत्वाने वागणारे, काटकसरी, कार्यक्षम, उत्साही, उत्तम व्यावसायिक आणि मनगटात धमक असणाऱ्या व्यक्ती आहात.  तुमच्या या गुणांच्या जोरावर तुम्ही छान वाटचाल कराल. अधिकारात वाढ होईल. नवीन जबदर्या मिळतील. अनुकूल शनी तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ देईल. दत्तगुरूंची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याने तुमच्यावरील संकटे दूर होतील. इष्ट मित्रांकडे मन मोकळे करत जा. पाठीच्या मणक्याचे त्रासापासून काळजी घ्या.


कन्या:- तुम्ही चटपटीत, हुशार, चिकित्सक, बुद्धिमान, धाडसी आहात. तुमच्या राशीत अनेक दिग्गज व्यक्तींनी जन्म घेतला आहे. वर्षाची सुरुवात काहीशी संथ झाली तरी नंतर प्रगतीचा आलेख चढता राहील. आरोग्य संवर्धन आणि त्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यवसायासाठी आर्थिक तरतूद होईल. येणी वसूल होतील. कामात घाई गडबड टाळली पाहिजे. संयम महत्वाचा आहे. बोलताना काळजी घ्या. शब्द जपून द्या. घरापासून काहीसे दूर जावे लागेल. अपत्यांकडून शुभ समाचार समजतील.

तुळ:- तुम्ही उत्तम व्यावसायिक, तीक्ष्ण बुद्धीचे, कलोपासक, सुंदर, कामात निपुण, मोजके बोलणारे, समतोल विचारांचे आहात. वायू तत्वाची पुरुष राशी असल्याने कामात वाकबगार आणि व्यवसायात पराक्रम गाजवणारे आहात. या वर्षी प्रमुख ग्रहमान फारसे अनुकूल नसले तरी तुम्ही तुमच्या अंगभूत सामर्थ्याने सहज मार्गक्रमण कराल. आध्यत्मिक उन्नती, आत्मचिंतन यासाठी हा कालावधी उत्तम आहे. मनातल्या मनात कुढु नका. चांगल्या मित्रांकडे मन मोकळे करत रहा. जुन्या गुंतवणुकीवर आता तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल. राहुचा जप तारक ठरेल. अडचणी दूर होतील. 

वृश्चिक:- तुम्ही तडफदार, धाडसी, चटपटीत, कामाचा प्रचंड उरक असणारे, उत्तम वक्तृत्व लाभलेले, राजकारण निपुण, स्पष्टवक्ते आहात. नुकतीच तुमची आर्थिक गाडी मार्गी लागत आहे. तुम्ही बराच त्रास सहन केलेला आहे. केवळ तुम्ही होतात म्हणून त्यातून सहजतेने बाहेर पडलात. तुमचा आत्मविश्वास हीच तुमची ताकद आहे. मात्र बोलणे मृदू ठेवा. यावर्षी तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल. खडतर तपश्चर्येचे फळ मिळू लागेल. गृह कलह टाळा. कामाची दगदग जाणवेल. आरोग्य संभाळा.

धनू:- डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून व्यवसाय करणे तुम्हाला चांगला जमते. कोणत्याही परिस्थितीत डोके शांत ठेवून निर्णय घेणे, कामात सातत्य हे तुमचे विशेष गुण आहेत. काम काजात वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल. नवनवीन संकल्पना साकार होतील. छंद जोपासले जातील. स्थावर खरेदीचे व्यवहार मात्र सांभाळून करा. मैत्रीत दुरावा निर्माण होऊ शकतो. व्यसने आणि प्रलोभने टाळा. यशात जवळच मार्ग स्वीकारू नका. श्री. हनुमान उपासना साडेसातीवर चांगला उपाय आहे. अनुकूल गुरू आणि राहू तुम्ही बाजू समर्थपणे सांभाळेल. 

मकर:- मगर पाण्यातही राहते आणि जमिनीवरही राहू शकते. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला योग्य करणे, एखाद्या गोष्टीचा दीर्घकाळ पाठपुरावा करणे, चिकाटी, राजकीय कौशल्य हे तुमचे अंगभूत गुण आहेत. साडेसाती सुरू असली तरी राशीस्वामी शनीच असल्याने तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. मात्र प्रत्येक यशासाठी तुम्हाला झगडावे लागते. सर्वकाही कष्टसाध्य आहे, सहजासहजी मिळत नाही. अर्थात तुम्ही त्यासाठी तयार असतात. इतरांवर विसंबून कामे करू नका. वरिष्ठांची मर्जी संपादन करा. आर्थिक आवक चांगली होणार आहे मात्र खर्च देखील वाढते राहतील. पैशांचे नियुवजन उत्तम करा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. अनामिक भीती दाटून येईल. त्यावर मात करण्यासाठी श्री. हनुमान उपासना करणे आवश्यक आहे. 


कुंभ:- वायू तत्वातील सर्वात बुद्धिमान, अध्यात्मिक किंवा शास्त्रीय आशा दोन विरुद्ध टोकावर राज्य करणारी, आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासाठी करणारी, जराशी अव्यवहारी अशी तुमची राशी आहे. थोडक्यात “वेष बावळा परी अंगी नाना कळा” असे तुमचे वर्णन करता येईल. राशीस्वामी शनी महाराजांची साडेसाती असली तरी तुम्ही कायम नम्र राहिलात तर तुम्हाला हा कालावधी चांगला जाईल. वर्षाची सुरुवात उत्साही, तुमचा मान सन्मान वाढवणारी आहे. ग्रहमान फारसे अनुकूल नसले तरी मागील पुंजीवर तुम्ही उत्तम वाटचाल करू शकाल. अर्थात ही पुंजी केवळ आर्थिकच असेल असे नाही. कौटुंबिक कलह उदभवू शकतो. गैरसमज वेळीच दूर करा. 

मीन:- आकर्षक व्यक्तिमत्व, भोळा आणि सरळ स्वभाव, सामाजिक कार्याची आवड, निरागसता, कामातील सातत्य आणि अनुकूल ग्रहमान या तुमच्या जमेच्या बाजू आहेत. वेंधळेपणा, समजुतीच्या अभाव या गोष्टी टाळल्यास तुमची प्रगती सुसाट होणार आहे. तुमची प्रगतीची घोडदौड कोणी रोखू शकणार नाही. आर्थिकरित्या तुम्ही उच्च पातळीवर पोहोचाल. स्वप्ने साकार होतील. व्यावसायिक आडाखे अचूक ठरतील. संधीचे सोने करा. आर्थिक नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. फालतू खर्चाला कात्री लावा. दीर्घकालीन फायद्याचे करार आणि गुंतवणूक करा. राजकीय भूमिका आणि वक्तयव्ये टाळा. 

!! शुभम भवतु !! Rashi Bhavishya 2021

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

(Rashi Bhavishya 2021 – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521व्यवसायवृद्धी, करियर, शिक्षण, विवाह, कौटुंबिक प्रश्न, परदेश गमन, आरोग्य, इत्यादीवर कुंडलीवरून ज्योतिष मार्गदर्शन तसेच बारा राशीवर आधारित देश विदेशात गाजलेला “राशीभाव” या कार्यक्रमासाठी संपर्क करा. अधिक माहितीसाठी राशीभाव या फेसबुक पेज भेट द्या.)