सर्वात वर

आजचे राशिभविष्य शुक्रवार,१६ एप्रिल २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

Rashi Bhavishya Today – राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – रोहिणी  
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.(संपर्क – 8087520521)

Rashi Bhavishya Today  

मेष:- खर्चात टाकणारा दिवस आहे. छंद जोपासला जाईल. मन रमवणे आवश्यक आहे.     

वृषभ:- चैनीवर खर्च कराल. मित्र मंडळी आठवण काढतील. आनंदात कालावधी व्यतीत होईल.  

मिथुन:- मन उदास राहू शकते. हुरहूर वाटेल. कुल देवतेची उपासना करा. 

कर्क:- आर्थिक आवक चालली राहील. मन आनंदी राहील. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल.  

सिंह:- सौख्य लाभेल. उत्साही वाटेल. सहकारी मदत करतील.   

कन्या:- सरकारी कामात चालढकल नको. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. काळजी घ्या.  

तुळ:-  आरोग्याची काळजी घ्या. छंद जोपासा. ध्यानधारणा अति आवश्यक आहे.  

वृश्चिक:- शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्या.

धनु:- आर्थिक आवक चांगली चालू आहे. वेळ दवडू नका. आनंदी वाटेल.    

मकर:- अपत्य संबंधित चिंता निर्माण होऊ शकते. स्पर्धेत अधिक मेहनत करावी लागेल.  

कुंभ:- वास्तू संबंधित कामे रेंगाळतील. आराम करण्याची गरज निर्माण होईल.    

मीन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. लेखन घडेल. सन्मान मिळतील. 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

( Rashi Bhavishya Today – कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)