सर्वात वर

भेंडी चटणी

शीतल पराग जोशी 

भेंडीची भाजी आपण नेहेमी करतो. पण आज भेंडीची चटणी (Bhendi Chatani) करून बघू या. खूप छान लागते. करून बघा नक्की.

साहित्य: १ वाटी चिरलेली भेंडी, थोडा कांदा, 6 लसूण पाकळ्या, 2 लाल मिरच्या, 1 टोमॅटो, 4 बुटुक चिंच, १ टीस्पून धणे, 2 टीस्पून उडीद डाळ, 1 टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून कढीपत्ता, 1 टीस्पून कोथिंबीर, तेल, मीठ

कृती:-भेंडी स्वच्छ धुवून चिरून घ्यावी. कांदा, टोमॅटो चिरून घ्यावा. एक पॅन घेऊन त्यात थोडे तेल घालावे. त्यात जिरे, धणे आणि लाल मिरच्या परतवून काढून घ्याव्यात.  नंतर त्यातच भेंडी, कांदा, टोमॅटो वेगवेगळे फ्राय करून घ्यावेत. मिक्सरला प्रथम जिरे, धणे आणि मिरच्या बारीक करून घ्याव्यात. नंतर त्यात भेंडी, कांदा, लसूण, टोमॅटो घालून बारीक करून घ्यावे. मीठ घालावे.चिंच भिजवून त्यात घालून कोथिंबीर घालावी.आणि परत एकदा मिक्सरला फिरवावी. छान चटणी (Bhendi Chatani) तयार होते. 

फोडणी: एक छोटी कढई घेऊन त्यात तेल घालावे. जिरे, मोहोरी, तडतडले की त्यात हिंग, उडीद डाळ घालावी. कढीपत्ता टाकून चटनीवर ही फोडणी घालावी. खूप मस्त लागते.आंध्र प्रदेशात ही चटनी खाल्ली जाते.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२