सर्वात वर

गाजर केक

शीतल पराग जोशी 

Carrot Cake

साहित्य: 2 वाटी मैदा, 1 वाटी मिल्कमेड, 1 टीस्पून सोडा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, पाऊण वाटी पातळ केलेले बटर, 4 टीस्पून पिठीसाखर, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स, 2 वाटी किसलेले गाजर

कृती : १) मिल्कमेड, पातळ केलेले बटर, पिठीसाखर,व्हॅनिला एसेन्स हे सर्व एकत्र करून हलवून घ्यावे. चांगले मिक्स होईपर्यंत फेटून घ्यावे. 2) त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून चाळणीने चालून घ्यावे. वर केलेल्या मिश्रणात हे सर्व टाकून त्यात गाजर किस घालावा. मग सगळे छान फेटून घ्यावे. हवे असल्यास दूध घालावे. केकपात्राला तूप लावून त्यावर मैदा भुरभुराव. आशा पद्धतीने केकपात्र तयार होते. सर्व मिश्रण केक पात्रात टाकून द्यावे.

एक कुकर घेऊन तो प्रीहीट करण्यास ठेवावा. त्यावर  स्टँड ठेवून त्यावर हे केकपात्र 30 मिनिट ठेवून द्यावे. मंद आचेवर हा केक वर फुगून येतो. टूथपिक टाकून पहावी. ती कोरडी निघाली की आपला केक तयार झाला.

गॅस बंद करून थोड्या वेळाने हा गाजर केक काढावा. थंड झाला की डिशमध्ये काढून त्याचे तुकडे करावेत.असा हा गाजर केक (Carrot Cake ) छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो.मैद्या ऐवजी  तुम्ही गव्हाचे पीठ पण वापरु शकतात.. करून बघा मग.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी

संपर्क-९४२३९७०३३२