सर्वात वर

गाजर कैरीची वाटली डाळ

शीतल पराग जोशी 

(Carrot Carrie Dal)

आपण कैरीची वाटली डाळ नेहमी करतो. आज जरा हटके गाजर कैरीची वाटली डाळ (Carrot Carrie Dal) करून बघू.

साहित्य: १ वाटी हरभरा डाळ, 1 वाटी गाजराचा किस, अर्धी वाटी कैरीचा किस, 2 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, 2 टीस्पून साखर, मीठ, 1 टीस्पून मोहोरी, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हिंग, कढीपत्ता, तेल, कोथिंबीर, 1 टीस्पून हळद


कृती: हरभरा डाळ 2 तास भिजत घालावी. त्यानंतर ती जाडसर वाटून घ्यावी. गाजर आणि कैरी धुवून त्याचा किस करावा. नंतर ही वाटलेली डाळ एका बाउल मध्ये घेऊन त्यात हा गाजराचा आणि  कैरीचा किस घालावा. मीठ आणि साखर घालावी. ओले खोबरे घालावे. आणि सर्व एकत्र करावे.

नंतर एक छोटी कढई घेऊन त्यात तेल घालावे. ते तापले की त्यात जिरे, मोहोरी घालावी. ते तडतडले की त्यात हिंग घालावा. हळद, आणि मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालावा. आणि अशी ही खमंग फोडणी डाळीवर घालावी. कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे.  अशी ही छान आंबट, गोड ,तिखट डाळ (Carrot Carrie Dal) चवीला खूप भारी लागते. करून बघा नक्की.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२