सर्वात वर

चमचम

शीतल पराग जोशी 

चमचम(Chamcham)ही fireless रेसिपी आहे. अत्यंत पौष्टिक आणि झटपट होणारी आहे. लहान मुलांना खूप आवडते. 

साहित्य: 4 wheat ब्रेड, 3 चमचे मलई, 2 टिस्पून ड्राय फ्रुट्स, 3 चमचे रोझ सिरप, 2 टीस्पून पिठीसाखर, 1 वाटी डेसीकेटेड कोकोनट,  2 चमचे टूटीफ्रुटी, 

कृती: प्रथम ब्रेडच्या स्लाइस घेऊन वाटीने त्याचे गोल कापावेत.8 गोल कापावेत.  एका वाटीत मलई घेऊन त्यात पिठीसाखर घालून ड्रायफ्रूट चुरा घालून चांगले मिक्स करावे. नंतर हे मिश्रण ब्रेडच्या गोल कापाना लावावे. दोन्ही गोल एकमेकांवर ठेवावे. असे 4 चमचम तयार होतील. एका वाटीत रोझ सिरप घेऊन हे चमचम त्यात डीप करावेत. नंतर एका डिशमध्ये डेसीकेटेड कोकोनट घेऊन त्यात हे डीप करावे. 20 मिनटं फ्रीझ करून घ्यावे. वरून टूटीफ्रुटी आणि ड्राय फ्रुट्स ने सजवावे. झाले आपले छान चमचम (Chamcham) खायला तयार.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२