सर्वात वर

मोबाईल खाकरा

शीतल पराग जोशी  


साहित्य: रेडीमेड square खाकरा(Mobile Khakara), 3 टीस्पून चाट मसाला, 2 टीस्पून तिखट, 1 वाटीबारीक चिरलेला कांदा,1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 4 मिरच्या,1 वाटी बारीक शेव, अर्धी वाटी चीझ,मीठ चवीनूसार, अर्धी वाटी कोथिंबीर

कृती: अत्यंत झटपट होणारा असा हा मसाला खाकरा आहे. वेगवेगळ्या फ्लेवरचे खाकरे मार्केटला मिळतात. त्यातील पावभाजी आणि पाणीपुरी खाकरा खूप सुंदर लागतो.गोल खाकऱ्यांपेक्षा हा खाकरा छान लागतो. मोबाईल सारखा दिसतो. म्हणून मी त्याला मोबाईल खाकरा (Mobile Khakara) नाव ठेवले.रेडिमेड खाकरा आणला की कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून घ्यावे. मग एका प्लेटमध्ये हा खाकरा घेऊन त्यावर तिखट, चाट मसाला,हवे असल्यास मीठ भुरभुरावे. मग त्यावर कांदा, टोमॅटो, मिरची तुकडे, कोथिंबीर घालावी. वरून बारिक शेव आणि किसलेले चीज टाकावे. वा असा मस्त बहारदार खाकरा खावा.

सध्या सुटीमुळे मुलांना खूप भूक लागते. तर हा खाकरा करून द्या. बघा मुले कशी खुश होतात. आणि असा झटपट होणारा खाकरा समोर आला की तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल ना.

टीप: हया खाकऱ्यावर तुम्ही  मोड आलेले कडधान्य पण टाकू शकतात. चला मग मस्त खा.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी  

संपर्क-संपर्क-९४२३९७०३३२