सर्वात वर

मुळ्याचा पराठा

शीतल पराग जोशी 

(Mulyacha Paratha)

साहित्य: 2 मुळे, 2 वाटी कणिक, 1 वाटी भाजणी पीठ, 2 टीस्पून तिखट, 1 टीस्पून हळद, 1 हिरवी मिरची, 1 टीस्पून हिंग,1चमचा कोथिंबीर ,तेल, मीठ

कृती: मुळे धुवून किसून घ्यावे. नंतर त्यात कणिक, भाजणी पीठ घालावे. त्यात तिखट, हळद, हिंग, मिरची, मीठ, तेल घालून कणिक घट्ट भिजवून घ्यावी. आवश्यक असल्यास पाणी घालावे. नंतर तेल लावून गोळा तयार करावा. मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन तो जाडसर लाटावा.तवा घेऊन तो तापला की त्यावर हा पराठा टाकावा. चहूबाजूने तेल सोडावे. पराठा टम्म फुगला की उलटावा. मस्त मऊ पराठे (Mulyacha Paratha)तयार होतात.

लिंबाचे लोणचे किंवा सौस बरोबर सर्व्ह करावे. मुले पण आवडीने खातात. 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी

संपर्क-९४२३९७०३३२