सर्वात वर

तांदुळाचे घावन

शीतल पराग जोशी 


आपण वेगवेगळ्या प्रकारची धिरडी करतो. त्यात तांदळाचे हे घावन (Tandulache Ghavan) खुप छान लागतात. 

साहित्य: २ वाटी तांदूळ पीठ, 1 चमचा चना डाळ पीठ, 1 टोमॅटो, 2 कांदा, 2 मिरची, आले लसूण पेस्ट (ऑपशनल), 2 चमचे कोथिंबीर,1 टीस्पून तिखट, तेल, मीठ

कृती: एका बाऊलमध्ये तांदूळ पीठ घेऊन त्यात चना डाळ पीठ घालावे. मग त्यात टोमॅटो, कांदा, आले, लसूण, मिरची पेस्ट घालावी. तिखट, मीठ घालावे. कोथिंबीर घालावी. पाणी टाकून सरसरीत भिजवून घ्यावे. डोसा पीठ असते त्याप्रमाणे पीठ असावे. एक निर्लेप तवा घेऊन तो तापला की त्यावर तेल सोडावे. त्यावर हया मिश्रणाचे छोटे घावन घालावेत. थोडे झाकण ठेवून ते उलटवून घ्यावे. परत तेल सोडावे. मस्त लालसर रंग आला की घावन काढून घ्यावे. असे हे घावन नारळाच्या हिरव्या चटणी बरोबर छान लागतात. शिवाय पोटाला पण हलके असतात. तुम्ही नुसते तांदूळ पीठ, मिरची, मीठ घालून पण हे घावन (Tandulache Ghavan)करू शकतात. 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२