सर्वात वर

आलू चाट

शीतल पराग जोशी 

साहित्य: (Aloo Chaat) 4 उकडलेले बटाटे, 1 वाटी दही, अर्धी वाटी बारीक शेव,  2 कांदे बारीक चिरलेले, 1 टीस्पून तिखट ,2 चमचे चिंच चटणी, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, 2 चमचे पुदिना मिरची चटणी( हवी असल्यास), 2 चमचे कोथिंबीर, चाट मसाला, पुदिना पाने, मीठ

कृती : उकडलेले बटाटे लांबट चिरून प्लेटमध्ये ठेवावे. त्यावर तिखट, मीठ, चाट मसाला टाकावा.  त्यावर कांदा, टोमॅटो टाकावे. त्यावर दही, पुदिना चटनी, चिंच चटणी टाकावी. वरून पुदिना पाने, कोथिंबीर टाकावी. आणि मस्त वरून बारीक शेव भुरभुरावी. अहाहा असे टेस्टी लागते हे आलू चाट. त्यावर तुम्ही पाणीपुरी च्या पुऱ्या पण कुस्करून घालू शकतात.करून बघा मग साधी सोपी आलू चाट. (Aloo Chaat)

अशाच डीशेशचे हॉटेलमध्ये खूप महाग असतात. घरी आपण हवे तितके खाऊ शकतो. कोशिंबीर ऐवजी हा एक मस्त पर्याय आहे.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२