सर्वात वर

टीआरपी घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे CEO खानचंदांनी यांना अटक

मुंबई-गेल्या काही  महिन्यापूर्वी उघडकीस आलेल्या टीआरपी घोटाळ्या प्रकरणी रिपब्लिक टीव्ही चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी रिपब्लिक टीव्हीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाचा तपास CBI कडे देण्याची मागणी रिपब्लिक टीव्हीने केली होती. मात्र, सर्वोच्च  न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली होती.अखेर आज (रविवार १३ डिसेंबर )रोजी खानचंदानी यांना त्यांच्या घरी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मुंबई पोलिसांनी ऑक्टोबर मध्ये बनावट TRP रॅकेटचा पर्दाफाश केला होता. आर्थिक देवाणघेवाण करून TRP वाढण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. रिपब्लिक टीव्ही सह या प्रकरणात इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं समोर आली होती. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तेरा जणांना अटक केली आहे.