सर्वात वर

Zee Marathi : सई आणि आदित्य वर चित्रित झालं रोमॅंटिक गाणं

झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ ही मालिका रसिक प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय झालीये. आदित्य सई ला कधी प्रपोज करणार याची उत्सुकता सर्वानाच लागलीये,सई आणि आदित्यच्या प्रेमाचे उत्कट क्षण साई आणि आदित्य वर मालिकेत “तुजविण मीही अपुरी, तुजविण मीही आधा अन् अधुरा” हे रोमॅंटिक गाणं (Romantic Song) चित्रीत झालंय, ह्या गाण्याचे गीतकार अभिषेक खणकर असून संगीत समीहन यांचं आहे तर आनंदी जोशी (Anandi Joshi) आणि रोहित राऊत (Rohit Raut) यांनी हे गाणं गायलं आहे.

सईचा आदित्यच्या ST ला गाठायचा प्रयत्न, त्यात येणारे अडथळे. सगळ्या अडचणी पार करून सई आदित्यच्या दापोलीच्या घरी पोहोचते. आणि तिथे मेघनाच्या घराला कुलूप लागलेलं दिसतं, आज लग्न ठरणार नाही हे आदित्यला समजतं.

आदित्यचा सईचा मुंबईला परत पाठवून देण्याचा प्रयत्न करतो, पण सईत तो इतका गुंतलाय की सईला छिडकारू शकत नाही आणि दापोलीच्या घरात दोघे शेवटची रात्र एकत्र घालवण्याचं ठरवतात. दापोलीच्या याच निसर्गसंपन्न वातावरणात सई आणि आदित्यवर त्यांच्या प्रेमाचं आणि भावी संसाराच्या स्वप्नाचं तुजविण मीही अपुरी, तुजविण मीही आधा अन् अधुरा या गाण्यात शनिवारी १९ डिसेंबरच्या भागात रात्री ९ वाजता बघता येणार आहे.