सर्वात वर

Salman Khan सेल्फ क्वॉरंटाईन

मुंबई- कोरोनाच्या विळख्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अडकले होते.आता कोरोना व्हायरस बॉलिवूडचा दंबंग सलमान खानच्या(Salman Khan) घरात पोहचला आहे.सलमान खानचा ड्राइवर आणि दोन स्टाफ मेंबर्सला  कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पिंकविलाच्या वृत्ता नुसार सलमान खान आता १४ दिवसा साठी सेल्फ क्वॉरंटाईन राहणार आहे. 

सध्या सलमान खानचा बिग बॉस- १४ चे अँकरिंग करतो आहे. त्यामुळे या आठवड्यात तो ‘बिग बॉस च्या चित्रीकरणासाठी हजेरी लावणार कि ऑनलाईन माध्यमांतून हजर राहणार या बाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबाला आयसोलेशन राहण्यास सांगितले आहे. तसेच ड्राइवर अधिक सह दोघा स्टाफला पुढील उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.