सर्वात वर

पुण्यात ओबीसीचा मोर्चा : माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक

पुणे – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे तर्फे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे शहरात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत ओबीसी बांधवाचा मोर्चा काढण्यात येत होता..या मोर्चाला पुढे जाण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केल्याने ओबीसी बांधवांनी शनिवारी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या मांडत आंदोलन केले.आंदोलना दरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवाना पोलिसांकडून अटक करण्यात आली.त्यानंतर त्यांना फरास खाना विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे .