सर्वात वर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. सकाळी १० वाजेच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होते तेव्हापासूनच त्यांच्यावर  ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावली आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांनी काँग्रेसमध्ये अनेक पदांवर कामे केली.महाराष्ट्रात काँग्रेसच्या विस्तारात त्यांचे मोठे योगदान होते. एकनाथ  गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. 

धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.त्यांच्या निधनाने मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकल्याची भावना विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.