सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

गुढशास्त्राचा  व्यासंग  राहतो. वृद्धपकाळी ईशचिंतनात काळ जातो. अष्टमात शनी (Shani Shastra) असता पूर्ववयात एकदातरी भाग्याचा नाश होतो.11,10,7,2 राशीतला शनी दारिद्र्य फारसे आणणार नाही. आयुष्य सुखावह जाईल अथवा  स्त्रीधन मिळेल.5,1 राशीचा शनी वृद्धपकाळी फार दारिद्र्य देतो. ऐतिहासिक स्थित्यंतरे घडवितो. या ठिकाणचा शनी काही वेळा असे करतो, की मध्यमवयात ऐश्वर्य भोगले असले, तरी शेवटची स्थिती चांगली ठेवीत नाही. 

विशाखा नक्षत्रात शनी असता आयुष्यात बरीच उलथा-पालथं करतो. अनुराधा नक्षत्रात शनी असता व्यक्तीस भोगी बनवितो. व्यक्ति धूर्त व अप्पलपोटी असतो. जेष्ठा नक्षत्रात शनी असता आपल्या मुसद्देगिरीनें फसवून सत्ता गाजवण्याची जागा मिळवतो. अशा व्यक्ती मोठ्या बुद्धिमान, चिकाटीच्या व मुत्सद्दी असतात. अशा माणसाचे भाग्य फार उशिरा उदयास येते. 10,8,7,5,1 या राशीतला शनी अधिकार, वैभव, संपत्ती, सन्मान देईल. उपजीविका जेमतेम चालेल. मात्र, कर्क राशीचा शनी  असता धनलाभ होईल.  

धनू राशीचा शनी  असता भाग्योदयाला  उतरती कला लागते . अष्टमातील शनीचे एकंदरीत फल असे आहे,की   पूर्ववयात जर कष्ट पडले असतील, तर वृद्धापकाळात सौख्य मिळते. पूर्ववयात सौख्य मिळाले असेल, तर वृद्धपकाळात दारिद्र्य,दुःख ,धननाश, बेअब्रू ई. प्रसंग निर्माण होतात. वृषभेचा शनी असता निर्धन होतो.कर्क राशीचा शनी (Shani Shastra) असता कठीण परिश्रमाने निर्वाह होतो. 12, 9 राशीचा असता उदरनिर्वाह कसाबसा होतो.

11,10, 7,2 राशीचा शनी निदान दारिद्र्य आणणार नाही, आयुष्य सुखात जाईल अथवा स्त्रीधन मिळेल.  11, 10,7 राशीचा शनी असता अचानक धनलाभ होणार नाही. स्त्रीधन मिळणार नाही.  आयुष्यात दुर्गंधयुक्त आजाराने मृत्यू येतो. या स्थानी शनी शुभ राशीत, शुभ संबंधित किंवा बलवान असता दीर्घायुष्य देतो. या स्थानातील शनी दीर्घ मुदतीच्या दुखण्याने मृत्यू देतो. येथे शनी असून 12, 8, 4 राशीचा चंद्र असेल आणि हर्षल- मंगळाच्या काटकोनात असेल तर पाण्यात बुडून मृत्यू येण्याचा संभव असतो. या ठिकाणचा शनी मंगळ, हर्षलचे वर अशुभदृष्टीत नसेल, तर निदान आयुष्य 66 ते 71 च्या दरम्यान असते .-10,8,7,5,1 राशीचा शनी आयुष्य  भरपूर देतो. 

अष्टमातला शनी ज्या राशीचा असेल त्या राशीने दर्शविलेल्या आजाराने मृत्यू देतो. तसेच बहुतकरून परप्रांतात मृत्यू देतो या ठिकाणी शनी स्वगृही उच्च राशीत असता दीर्घायु होतो. 8,1, राशीचा असता अल्पायु होतो. या ठिकाणचा शनी दुःख व दैन्य देणारा आहे.मृत्यू लांब मुदतीच्या आजाराने (क्रमशः) भाग- ११२

Hari Anant
हरिअनंत,नाशिक 

संपर्क – 9096587586