सर्वात वर

नविन बिटको रुग्णालयातील अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा शशीभाई उन्हवणे यांची मागणी

नाशिक – नाशिक महानगर पालिकेच्या नवीन बिटको हॉस्पिटल (New Bytco Hospital) मध्ये सुरु झालेल्या कोव्हीड सेंटर मधील रुग्णांना रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध होत नसून त्याठिकाणी या  इंजेक्शनचा मोठया प्रमाणावर काळाबाजार सुरु आहे.तसेच या रूग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा ही निकृष्ठ असून या मध्ये मोठयाप्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. य सर्व गोष्टींची तातडीने चौकशी करून रुग्णालयातील अधिकारी व ठेकेदार यांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे (Shashibhai Unhavane) यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त आणि नाशिकरोड पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. 

काय म्हंटले आहे निवेदनात