सर्वात वर

झी मराठीवरील मालिकांचे शूटिंग महाराष्ट्रा बाहेर सुरू : आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार

मालिकांची शूटिंग सुरु महाराष्ट्राच्या महावाहिनीने घेतला अविरत मनोरंजनाचा वसा.

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.अशावेळी लॉकडाऊनमध्ये घरात असलेल्या प्रेक्षकांसाठी झी मराठी सज्ज आहे. या परिस्थितीत देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी मराठीने कंबर कसली आहे.आता झी मराठीवरील (Zee Marathi) मालिकांचं चित्रिकरण आता बेळगाव, गोवा, सिल्वासा, दमण आणि जयपूर याठिकाणी होणार आहे.

सगळीकडे फक्त संचारबंदीच्याच बातम्या सुरु आहेत, ह्या सर्व नकारात्मक गोष्टीतून बाहेर येण्यासाठी झी मराठी (Zee Marathi) रसिकांसोबत असणार आहे.आपल्या आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत.सोशल मीडियावर देखील याचे मिम्स व्हायरल होत आहेत.

झी मराठीवरील कोणत्या मालिकांचे चित्रीकरण कुठे होणार पाहूया !

होम मिनिस्टर – घरच्या घरी

पाहिले न मी तुला – गोवा

येऊ कशी तशी मी नांदायला – दमण

अग्गबाई सुनबाई – गोवा

माझा होशील ना – सिल्वासा

चला हवा येऊ द्या – जयपूर

देवमाणूस – बेळगाव

तसेच वेध भविष्याचा माध्यमातून भगरे गुरुजी रोज सकाळी आपल्या भेटीस येणारच आहेत सोबत रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचे नवे भाग देखील तयार आहेत.  त्यामुळे आपल्या आवडत्या मालिकांचे ओरिजिन भाग झी मराठीच्या रसिकांना पाहता येणार आहेत प्रेक्षकांसोबतचे हे ऋणानुबंध जपत, ह्या कठीण काळात सुद्धा मनोरंजन करण्याचं वचन ‘झी मराठी’ (Zee Marathi) आपल्या प्रेक्षकांना देत आहे.

Shooting of Zee Marathi Series Starts Outside Of Maharashtra