सर्वात वर

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली – भारतीय संघाचा तरुण यष्टीरक्षक पार्थिव पटेल (Parthiv Patel )यांनी आपण सर्वप्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय आपल्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर केला आहे.३५ वर्षाच्या पार्थिवने आज पर्यंत २५ कसोटी सामने, ३८ वन-डे आणि २ टी-२० मॅचेस मध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

पार्थिवने २००२ साली वयाच्या १७ व्या वर्षात भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले.तेव्हा तो भारतीय संघात तो सर्वात कमी वयाचा होता.देशांतर्गत क्रिकेटचे सामने तो गुजरात कडून खेळायचा भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनीच्या आगमनानंतर पार्थिवने संघातली आपली जागा गमावली जरी असली तरी भारतीय आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिव खेळत होता.नुकत्याच झालेल्या IPLच्या १३व्या सिझनमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात होता.परंतु त्यालाअंतिम ११ मध्ये संधी मिळाली नाही.

२०१५ साली IPL मध्ये पार्थिव पटेलने मुंबई संघाकडून त्याने सर्वाधिक ३३९ धावा केल्या होत्या. त्याच वर्षी मुंबई संघाने IPL चे विजेतेपद देखील मिळवले होते.

पार्थिव पटेलने विजय हजारे ट्रॉफीत शतक झळकावून गुजरातला संघाला विजेतेपद मिळून दिले होते.त्यानी फेब्रुवारी २०१६ मध्ये अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती.त्यावेळी वृद्धीमान सहाला दुखापत झाली होती म्हणून पार्थिवला संघात स्थान मिळाले होते. सुरुवातीची काही वर्ष जोरदार कामगिरी केल्यानंतर पार्थिवच्या कामगिरीत घसरण झाली.भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचं १९४ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं होते.