सर्वात वर

स्टार फ्रुट (कर्मरंगा) -(आहार मालिका क्र – २१)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

आज आपण करमल म्हणजेच स्टार फ्रुट (Star Fruit) या फळाची ओळख पाहणार आहोत.यास कर्मरंगा,पाचक फळ या नावाने देखील ओळखले जाते.करमल हे मूळ भारत,मलेशिया,इंडोनेशिया,बांगलादेश,श्रीलंका या देशांमध्ये आढळते,भारतात प्रामुख्याने केरळ,पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मिळते.याचे सर्वाधिक उत्पादन मलेशिया या देशात होते.इंग्रजीत star fruit-Carambola या नावाने ओळखले जाणारे हे फळ ताऱ्याच्या आकाराचे असल्याने स्टार फ्रूट या नावाने ओळखले जाते.गडद चमकदार पिवळ्या रंगाचे हे फळ आंबट-गोड या दोन जातीची असतात,यापैकी लहान आंबट व मोठी आकाराने गोड असतात.अश्या या फळाची आपण आज माहीती बघणार आहोत.

स्टार फ्रुटचे-(Star Fruit) (कर्मरंगा)आरोग्यास फायदे    

१.या फळाचे उर्जा मुल्य 31 kcal असून या फळात carbohydrates-6.73gm,sugar-3.98gm,fat-0.33gm,proteins-1.04gm,fibre-2.8gm,vit A-luiten xeoxanthin-66mcg,folate vit B9-12mcg,thiamine,riboflavin,niacin,B6,colin,vit C,vit E,calcium,iron,magnesium,manganese,potassium,sodium,oxalic acid एवढी घटक द्रव्ये आढळतात.

२.हे फळ एक शक्तीवर्धक फळ,पाचक फळ म्हणून ओळखले जाते.

३.सालासकट सगळे फळ खाणे योग्य.

४.या फळाचा उपयोग ताप व डोळ्याचा संसर्ग कमी करण्यासाठी होतो.

५.तंतुमय फळ असल्याने शरीरातील साखरेवर नियंत्रण राहाते.

६.या फळात पोटाचे अल्सर बरे करण्याचे गुणधर्म सापडतात.

७.त्वचा विकारात या फळाचे सेवन केल्यास त्वचा रोग लवकर बरे होण्यास मदत होते.

८.फळात कॅलरीज कमी असल्याने स्थूल व्यक्तीं देखील या फळाचे सेवन करु शकतात.

९.घशाचा संसर्ग(throat infection),कफ होणे,दमा,जुलाब,अपचन,तोंड-दात दुखणे व त्याचे आजार या तक्रारींमध्ये हे फळ योग्य काम करते.

१०.हे फळ कृमीघ्न,सूक्ष्म जंतूघ्न म्हणून काम करते.

सावधान!!!

१.कोलेस्टेरॉल चे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णांना स्टॅटीन या गटातील औषधे चालू असतात व हे फळ खाल्ल्याने औषधाचे शरीरांतर्गत उपलब्धता वाढते यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे

२.या फळाचे सेवन किडनी स्टोन,किडनी चे विकार या रुग्णांनी टाळावे.

३.दूधासह सेवन सर्वथा टाळावे.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी 

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०