सर्वात वर

दीपा कार्तिकचा होणार घटस्फोट ?

रंग माझा वेगळा मालिकेत येणार नवा ट्विस्ट 

मुंबई – स्टार प्रवाहवरील (Star Pravah) लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत एक मालिकेत येणार नवा ट्विस्ट आला आहे. सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे.दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं.  मग दीपाने ही स्वाभिमानाने  इनामदारांचं घर सोडत एकटं रहाण्याचा निर्णय घेतला आहे. दीपा दररोज नवनवी आव्हानं स्वीकारते आहे  परिस्थिती समोर हतबल न होता ती पुढील वाटचाल करते आहे. मात्र पहिल्या पासून दीपाच्या विरोधात असणारी दीपाची सासू सौंदर्या इनामदारया कठीण काळात  तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे.आता सासुबाईँच्या आशिर्वादानेच दीपाने पुढचा प्रवास करण्याचं ठरवलं आहे.

सासुबाईंची खंबीर साथ लाभली असली तरी कार्तिकचा गैरसमज इतक्या टोकाला गेला आहे की त्याने आता दीपाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दीपावर त्याने जीवापाड प्रेम केलं त्याच दीपापासून विभक्त होण्याचं त्याने ठरवलं आहे. श्वेताच्या षडयंत्राला बळी पडत दीपापासून दूर जाण्याची वेळ कार्तिकवर आली आहे. या सगळ्यात सौंदर्याची प्रतिक्रिया काय असेल? कार्तिकला दीपाच्या खऱ्या प्रेमाची किंमत कळणार का? दीपा या प्रसंगाचा सामना कसा करणार?  हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. ‘रंग माझा वेगळा ‘ हि मालिका रसिकांना सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजचा  स्टार प्रवाहवर (Star Pravah) बघता येणार आहे.