सर्वात वर

‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ मराठीतून पहाण्याची मिळणार संधी

स्टार प्रवाहवर मनोरंजनाचा डबल धमाका

मुंबई – स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनी मनोरंजनाच्या बाबतीत नियमित वेगवेगळे प्रयोग करून रसिकांचे मनोरंजन करत असते.यावेळी स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका घेऊन येणार आहे.सुपरहिट चित्रपट ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji The Unsung Warrior) हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.या चित्रपटात अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका आहे.

तानाजी मालुसरे हे इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षराने कोरलेलं नाव. या शूरवीराने जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. तानाजी मालुसरेंच्या या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji The Unsung Warrior) सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हा दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृभाषेत पाहायला मिळणं ही पर्वणीच म्हणायला हवं.  मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या आणि नंबर वन हे बिरुद कायम राखणाऱ्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

या भव्यदिव्य सिनेमाविषयी सांगताना स्टार प्रवाह (Star Pravah) कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपल्या मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी स्टार प्रवाह वाहिनीने आणली आहे.’

अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली गेली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच सिनेमातली दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे. तेव्हा २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji The Unsung Warrior) सिनेमाचा मराठीतून आस्वाद घ्यायला विसरु नका से स्टार प्रवाहाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.