सर्वात वर

भारतीय शेअर बाजार 47000 च्या शिखरावर

विश्वनाथ बोदाडे ,नाशिक 

भारतीय शेअर बाजार (Stock Market) कोणत्याच कारणांना जुमानत नाही असे दिसत आहे ,बाजार थोडाही खाली आला की लागलीच खालच्या स्तरावर खरेदी येत आहे आणि बाजार पुन्हा नवीन उंची  गाठत आहे. आजही तसेच झाले सकाळी बाजार एकदम FLAT उघडले, त्यानंतर बाजार विक्री सुद्धा बघायला मिळली परंतु दुपार नंतर परत IT आणि PHARAMA क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा जोर बघायला मिळला, ह्या आठवड्यात पुन्हा बाजाराने पाचही दिवस तेजीत बंद झाला.  आणि प्रथमच  SENSEX ने  47000 टप्पा गाठला. 

त्यानंतर शेअर बाजारात (Stock Market) पुन्हा चढ उतार बघायला मिळाली. याला मुख्य कारण म्हणजे FII कडून प्रत्येक क्षेत्रातील समभागांमध्ये होत असलेली खरेदी आज सुध्दा FII ने 2700 करोड ची खरेदी केली तर DII प्रत्येक स्तरावर नफा वसुली करतांना दिसत आहे आज DII ने 2400 करोड ची विक्री नोंदवली, तरी सुद्धा बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 70 अंकांनी वधारून 46960 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 20 अंकांनी वधारून 13760 ह्या पातळीवर स्थिरावला तर निफ्टी सर्वांत जास्त VOLATILE बघायला मिळले परंतु  बंद होतांना 132 अंकांनी वधारून सकारात्मक म्हणजे 30714 ह्या पातळीवर बंद झाला.

IT क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेली TCS गुंतवणूकदारांकडून 3000 रुपये दराने 5,33,33,333 एवढे शेअर्स BUYBACK करत आहे याची शेवटची तारीख 1 जानेवारी आहे.

काल GOLD आणि SILVER मध्ये चांगली तेजी बघायला मिळली होती परंतु ही तेजी आज टिकू शकली नाही वरच्या स्तरावर नफा वसुली बघायला मिळाली.

शेअर बाजाराचे सूत्र सांगत आहेत की, शेअर बाजार (Stock Market) उंच स्तरावर असल्याने गुंतवणूक ही चांगल्या प्रतीच्या शेअर्समध्ये ठेवावी आणि BUY ON DIPS हे तंत्र अवलंबवावे.

NIFTY १३७६० + २०

SENSEX  ४६९६० + ७०

BANK NIFTY ३०७१४ + १३२%

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

DR. REDDY ५२४३ + ३% 

BAJAJ AUTO ३३५२ + ३% 

INFY ११८६ + २.३१%

WIPRO ३६३ + २% 

CIPLA ७९५ + २%


आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

INDUSINDBK ९०७ – ३%

HSFC BANK १४०९ – ३%

ONGC ९९.५० – २%

MARUTI ७५६० – २%

IOC ९४ – १.३६%

यु एस डी  आई एन आर $ ७३.६१२५

सोने १० ग्रॅम         ५००१५.००

चांदी १ किलो        ६७६३०.००

क्रूड ऑईल              ३५५४.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदाडे ,नाशिक