सर्वात वर

शेअर बाजारात पडझड : SENSEX 695 अंकांनी घसरला

जगातील।शेअर बाजार जरी सकारात्मक असले तरी आज भारतीय शेअर बाजारात नफा वसुलीचे सत्र बघायला मिळले ,आज सकाळी आंतरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे SENSEX 302 अंकांनी आणि निफ्टी 87 अंकांनी सकारात्मक उघडले परंतु आजचे सत्र खूप मोठ्या प्रमाणात VOLATILE बघायला मिळले , सकाळी सकारात्मक उघडल्यानंतर बाजार नकारात्मक झाला परंतु बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये काही प्रमाणात मागणी दिसली त्यामुळे बाजार सावरला सुद्धा होता पण दुपारी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री बघायला मिळाली PSU क्षेत्र सोडले तर सर्वच क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा जोर शेवट पर्यन्त कायम राहिला आणि त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 695 अंकांनी घसरून 43828 ह्या स्तरावर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 196 अंकांनी घसरून 12858 ह्या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर NIFTY BANK सुद्धा  540 अंकांनी घसरून 29196 ह्या पातळीवर बंद झाला. 

यामुळे मागील काही दिवसांच्या तेजीला आज ब्रेक बसला.आजच्या सत्रात रिऍलिटी आणि बँकिंग क्षेत्रा 2% ने घसरले.

मागील काही दिवसांपासून विदेशी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून भारतीय शेअर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे त्यामुळे बाजाराने आज अजून एक नवा उच्चांक गाठला परंतु वरच्या स्तरावरून आज नफा वसुली बघायला दिसली. उद्या भारतीय बाजारात F&O ची EXPIRY आहे आणि शुक्रवारी यु एस मार्केट बंद आहे तर सोमवारी श्री  गुरुनानक जयंती निमित्ताने भारतीय शेअर बाजार बंद राहतील त्यामुळे सुद्धा आज बाजारात नफा वसुली दिसली असे बाजाराचे सूत्र सांगत आहेत.

NIFTY १२८५८ – १९७

SENSEX  ४३८२८ – ६९४

BANK NIFTY २९१९६ – ५४०

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

O N G C ८१ + ६% 

GAIL १०२ + २% 

ADANIPORTS ३९८ + १%

SBI LIFE ८५० + १% 

COAL INDIA १२४ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

EICHERMOT २५९३ – ४%

AXIS BANK ५९८ – ४%

KOTAK BANK १८६८ – ३%

SUN PHRMA ५०७ – ३%

BAJFINANCE ४६९४ – ३%

यु एस डी  आई एन आर $ ७४.१६२५ 

सोने १० ग्रॅम      ४८८३०.००

चांदी १ किलो    ६०१४०.००

क्रूड ऑईल         ३३४८.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे

विश्वनाथ बोदडे,नाशिक