सर्वात वर

भारतीय शेअर बाजाराचा नवा उच्चांक

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

भारतीय शेअर बाजारात आज SENSEX आणि NIFTY ने इतिहासीक स्तर गाढला,आज सकाळी आंतरराष्ट्रीय स्तरांच्या संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार सकारात्मक म्हणजे SENSEX 254 अंकांनी तर NIFTY 74 अंकांनी सकारात्मक उघडले. बाजारात थोड्या हलक्या स्वरूपात VOLATILITY बघायला मिळली MIDCAP, SMALLCAP आणि BANKING क्षेत्रातील व RELIANCE मध्ये चांगली मागणी दिसली आणि त्याचाच परीणाम म्हणून भारतीय शेअर बाजारात एक नवा इतिहास नोंदवला गेला .

बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 495 अंकांनी वधारून 46103 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 136 अंकांनी वधारून इतिहासात प्रथमच 13529 ह्या पातळीवर स्थिरावला तर NIFTY BANK सुद्धा 447 अंकांनी वधारून 30709 ह्या पातळीवर बंद झाला.

बाजाराचे चित्र असे झाले आहे की, जगातील बाजार खाली असले तर भारतीय शेअर बाजार साह्य करत आहेत व भारतीय शेअर बाजार खाली बंद झाले तर रात्री जागतिक स्तरावरील बाजार सकारात्मक होतात आणि त्याचीच छाया सकाळी आपल्याकडे दिसत असते. भारतीय बाजारात प्रत्येक क्षेत्रातील शेअर्समध्ये FII गुंतवणूक करतांना दिसत आहे. जागतिक स्तरावरील बाजार मजबूत होण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरीकेत घोषित होऊ घातलेले प्रोत्साहनपर पॅकेज आणि भारतात गुंतवणूक वाढण्याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांनपासून उद्योग व्यवसाय सुरू झालेले असल्याने आर्थिक गाडी रुळावर येईल असे बोलले जात आहे.

बाजाराचे जाणकार सांगत आहेत की, कोविड वरील लस लवकरच देशभरात वितरीत केली जाणार आहे यामुळे सुद्धा बाजाराला सहारा मिळत आहे.बाजारात एक टेन्शन होऊ शकते ते म्हणजे US – CHINA BREXIT चे त्याचबरोबर बाजार ऊंच स्तरावर असल्यामुळे BUY ON DEEP हे तंत्र अवलंबवणे योग्य ठरेल.

NIFTY १३५२९ + १३६

SENSEX ४६१०३ + ४९५

BANK NIFTY ३०७०९ + ४४७

आज निफ्टी मधील वधारलेला शेअर्स

U P L ४९४.५० + ५%

ASIAN PAINT २५२८ + ४%

I O C ९४ + ३%

KOTAK BANK १८८३ + ३%

HDFC BANK १४०८ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

HINDALCO २४२ – २%

SHREECEM २४४२८ – २%

ULTRACEMCO ५१६६ – १%

WIPRO ३६० – १%

TATA STEEL ६०८ – १%

यु एस डी आई एन आर $ ७३.७२००

सोने १० ग्रॅम ४९६५०.००

चांदी १ किलो ६४२२२.००

क्रूड ऑईल ३३९१.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे ,नाशिक

Mobile-8888280555