सर्वात वर

शेअर बाजारात तेजी : NIFTY 13 हजार पार , SENSEX RECORD HIGH

आज भारतीय शेअर बाजारात SENSEX आणि NIFTY ने ऐतिहासिक उंच स्तर गाढला. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेत , कोविड-१९ वरील लस विषयी असलेली उत्सुकता, विदेशी वित्तीय संस्थांच्या माध्यमातून भारतीय शेअर बाजारात होत असलेली मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक परंतु दुसरीकडे जगभरात कोविड चे वाढती रुग्ण संख्या ह्या सर्वांच्या मध्ये आज  भारतीय शेअर बजाराने ऐतिहासिक उंची गाढून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 445 अंकांनी वधारून रेकॉर्ड हाय म्हणजे 44523 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा 129 अंकांनी वधारून 13055 ह्या ऐतिहासिक स्तरावर बंद झाला तर आज बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये सर्वात जास्त मागणी वाढल्यामुळे NIFTY BANK 713 अंकांनी वधारून 29737 ह्या पातळीवर बंद झाला.

आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर तब्बल 1603 समभाग सकारात्मक होते तर 1167 समभाग नकारात्मक दिसले आणि 175 शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही.सर्व प्रथम 1990 मध्ये चार अंकी म्हणजे 1000 SENSEX झाला होता त्यानंतर बाजाराने खूप चढ उतार बघितले .


1992 मध्ये हर्षद मेहता SCAM ने शेअर बाजाराला लाईम लाईट मध्ये आणले . तेव्हा SENSEX होता 4091 ,

2000 मध्ये DOT COM  तेजी आली अस्तित्वात नसलेल्या कंपन्या सुद्धा DOT COM झाली शेअर्स चे दर कोठल्या कोठे गेले आणि 1995 ते 2000 मध्ये जेव्हढा वाढला होता 78% फॉल आला होता.तेव्हा SENSEX होता 6026 ,2005

AMBANI BROTHERS RELIANCE ची दोन भावांमध्ये त्यांच्या कंपन्यांचे विभाजन 2005 मध्ये केले होते तेव्हा SENSEX होता 7000 हाच SENSEX डिसेंबर 2005 मध्ये 9000 झाला होता.

फेब्रुवारी 2006 मध्ये SENSEX 10000 झाला होता.

DECEMBER 2007 मध्ये 20000 SENSEX झाला होता

2014 मध्ये नवीन सरकार आल्यामुळे SENESX 23000 झाला होता. हाच नोव्हेंबरमध्ये 2014 मध्ये  28000 पर्यन्त पोहोचला होता.


2015- 30000

2017- 31000

2018- 38000

2019- 41000

2020- 44523

ह्या दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार आलेत परंतु बाजार आपल्या दिशेने उंच स्तर गाठतांना दिसत आहे, ह्याच प्रमाणे गुंतवणूक दारांनी सुद्धा आपली गुंतवणूक ही लांब अवधी साठी ठेवायला हवी.

NIFTY १३०५५ +१२८

SENSEX  ४४५२३ + ४४५

BANK NIFTY २९७३७ + ७१३

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

ADANI PORTS ३९२ + ५% 

AXIS BANK ६१९ + ४% 

HDFC BANK १४४४ + ४%

EICHER MOT २६८९ + ४% 

HINDALCO २२६ + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TITAN १३२८ – २%

HDFC २२२० – २%

B P C L ३९० – १%

NESTLEIND १७६३५ – १%

GAIL १०० – १%

यु एस डी  आई एन आर $ ७४.०२७५

सोने १० ग्रॅम          ४८८००.००

चांदी १ किलो        ५९४००.००

क्रूड ऑईल            ३२३५.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे


विश्वनाथ बोदडे,नाशिक Mobile – 8888280555