सर्वात वर

शेअर बाजार तेजीत : सेन्सेक्स,निफ्टी जोमात 

जागतिक आणि स्थानिक सकारात्मक संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार नवीन हाय बनवत आहे. काल  भारतीय शेअर बाजार बंद होता परंतु जागतिक स्तरावरील बाजारात जोरदार तेजी बघायला मिळली होती त्याचाच परीणाम आज सकाळी SENSEX 319 अंकांनी आणि NIFTY 82 अंकांनी सकारात्मक उघडले होते ,काही काळ तेजी कायम राहिल्यानंतर नफा वसुली आणि अस्थिरता दिसली एक वेळ बाजार नकारात्मक सुद्धा झाला होता , परंतु दुपारच्या सत्रात METAL, FINANACE आणि BANKING क्षेत्रातील शेअरमध्ये चांगली मागणी बघायला मिळाली त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक 314 अंकांनी वधारून 43952 ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 94 अंकांनी सकारात्मक बंद होऊन रेकॉर्ड हाय वर म्हणजे 12874 ह्या पातळीवर बंद झाला, 

आज बाजारात सर्वात जास्त VOLATILE राहिला तो निफ्टी BANK सकळी चांगली उसळी, त्यानंतर नकारात्मक पण बंद झाला तेव्हा तब्बल 587 अंकांनी वधारून 29181 ह्या पातळीवर स्थिरावला. आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर तब्बल 1443 समभाग सकारात्मक होते तर 1181 समभाग नकारात्मक दिसले आणि 146 शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही. बाजाराचे जाणकार सांगतात की, जगभरात जरी कोविड ची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दुसरीकडे कोविड वर लस शोधण्याचे काम संपूर्ण जगभरात युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळेच जगभरातील शेअर बाजारात नवीन नवीन स्तर बनवत आहे, जर इकॉनॉमी ओपन।झाली तर निश्चितच अर्थव्यस्थेला मदत होईल .तरी सुद्धा आपण इतिहास बघतीला आहे जेव्हा जेव्हा बाजार नवीन स्तर गाढतो तेव्हा नफा वसुली काही प्रमाणात दिसते त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबवावे .

NIFTY १२८७४ + ९४

SENSEX  ४३९५२ + ३१४

BANK NIFTY २९१८१ + ५८७

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

TATA MOTOR १५८ + ६% 

TATA STEEL ५२२ + ६% 

HDFC LIFE ६७३ + ६%S

BIN २४१ + ५% 

ADANI PORTS ३७८ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

B P C L ३९५ – ४%

HERO MOTOCO – ३०३४ – ३%

N T P C ८८.६० – ३%

I O C ८५ – २%

O N G C ७१ – २%

यु एस डी  आई एन आर $ ७४.५१२५

सोने १० ग्रॅम           ५०९००.००

चांदी १ किलो         ६३५००.००

क्रूड ऑईल               ३०७७.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे

विश्वनाथ बोदडे,नाशिक Mobile -8888280555