सर्वात वर

आठवड्याच्या शेवटी शेअर बाजारअस्थिर

विश्वनाथ बोदडे,नाशिक

आज भारतीय शेअर बाजारात जबरदस्त VOLATILE SESSION राहीले. सकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेतांच्या आधारे भारतीय बाजार SENSEX 163 अंकांनी आणि NIFTY 54 अंकांनी सकारात्मक उघडले काही काळ ही तेजी कायम राहिली परंतु नंतर बाजारात नफा वसुली सुद्धा बघायला मिळली पण आज संपूर्ण दिवस बाजार VOLATILE दिसला एक वेळ बाजार नकारात्मक सुद्धा झाला होता पण बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX 139 अंकांनी वधारून 46099 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 35 अंकांनी वधारून 13513 ह्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी BANK सुद्धा 94 अंकांनी वधारून 30605 ह्या पातळीवर बंद झाला.

आज बाजार VOLATILE राहण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजार दुपारी नकारात्मक सुरू होते त्याचेच पडसाद दुपारी उमटले परंतु शेवटी बाजारात PSU , ENERGY क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी बघायला मिळली त्यामुळे बाजार सकारात्मक बंद होण्यास मदत झाली.बाजाराच्या दीर्घकाळाचा विचार केला तर 1713 समभाग सकारात्मक होते तर 1188 समभाग नकारात्मक दिसले आणि 148 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही.

बाजाराचे जाणकार सांगत आहे की, बाजार उंच स्तरावर असल्याने बाजार यापुढे सुद्धा VOLATILITY बघायला मिळू शकते करण वरच्या स्तरावर नफा वसुली दिसू शकते, परंतु सध्या तरी बाजार FII गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय बाजाराच्या संकेतांच्या आधारे बाजार मध्ये चढ उतार दिसत आहे.

NIFTY १३५१४ + ३५

SENSEX ४६०९९ + १३९

BANK NIFTY ३०६०५ + ९४%

आज निफ्टी मधील वधारलेला शेअर्स
O N G C ९६.६५ + ६%
N T P C १०२ + ६%
GAIL १३८ + ३%
COAL INDIA १३८ + ३%
TATA STEEL ६२२ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

AXIS BANK ६१२ – २३%
DIVISLAB ३६५० – २%
ADNIPORTS ४६५ – १%
EICHERMOT २४६५ – १%
M & M ७२८ – १.११%

यु एस डी आई एन आर $ ७३.७८५०
सोने १० ग्रॅम ४९०९०.००
चांदी १ किलो ६३०७०.००
क्रूड ऑईल ३४५८.००

Mobile -8888280555