सर्वात वर

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ

जून अखेर पर्यत सर्वेक्षण पूर्ण होणार ; खा. गोडसे यांच्या हस्ते नानेगाव येथे शुभारंभ

 नाशिक : नाशिक आणि पुण्याला जोडणारा बहुचर्चित नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या(Nashik- Pune Semi High Speed Railway) सर्वेक्षणाला काल पासून सुरुवात करण्यात आली.या हायस्पीड रेल्वे मार्गामुळे नाशिकच्या विकासात अधिक भर पडणार आहे.हा रेल्वे मार्ग होण्यासाठी खा.हेमंत गोडसे यांच्या प्रयनांना यश आले आहे. काल सकाळी नाशिक तालुक्यातील नानेगाव येथून खासदार गोडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नाशिक – पुणे या रेल्वे मार्गाच्या (Nashik- Pune Semi High Speed Railway) सर्वेक्षणाला प्रारंभ झाला. दरम्यान या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करतांना कमीत-कमी शेती क्षेत्र कसे बाधित होईल, यासाठी पर्यायी मार्गाचे देखील सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यात येणार आहे. सर्वेक्षण करतांना शेतकरी हितालाच प्राधान्य देवून हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण साधण्यात येईल, असे आश्वासन खा. गोडसे यांनी याप्रसंगी दिले.जून अखेर पर्यत या बहुचर्चित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होणार

नाशिकसह पुणे मुंबई येथील औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिक तसेच नागरिकांनी रेल्वेमार्गाचा हा सुवर्ण त्रिकोण साधण्यासाठी वेळोवेळी खा. गोडसे यांची भेट घेवून नाशिक-पुणे रेल्वे मार्ग(Nashik- Pune Semi High Speed Railway) निमिर्तीसाठी मागणी केली होती. नाशिककरांच्या भावना लक्षात घेवून या रेल्वेमार्गासाठी गेल्या काही वर्षांपासून खा. गोडसे यांचे सततचे प्रयत्न सुर होते. या रेल्वेमार्गासाठी खा. गोडसे यांनी वेळोवेळी लोकसभेतही आवाज उठविला होता. खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने केंद्राने आणि राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वीच  नाशिक – पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. सदर रेल्वे मार्गाला साडे सोळा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यामध्ये राज्य शासन साडेतीन हजार कोटी व केंद्र शासन साडेतीन हजार कोटी रुपये निधी देणार असून सुमारे नऊ हजार कोटी रुपये निधी हा इक्विलिटीतून देण्यात येणार आहे. (राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी वीस टक्के तर साठ टक्के इक्विलिटीतून उपलब्ध करण्यात येणार आहे.

खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नाशिक-पुणे हा देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग (Nashik- Pune Semi High Speed Railway) अस्तित्वात येणार आहे. नानेगावसह संसरी, बेलतगव्हाण येथील शेतकऱ्यांनी या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनावरुन होणाऱ्या हालचालींवरुन विरोध दर्शविल्याने खा. गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेलचे अधिकारी आणि शेतकरी यांची काल बैठक पार पडली. या बैठकीत खा. गोडसे यांनी यशस्वी मध्यस्थी करीत शेतकरी हिताचाच प्रथम प्राधान्याने विचार करावा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज सकाळी खा. गोडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. याशिवाय याशिवाय देवळाली – वडगाव मार्गाने देखील या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करावे, जेणेकरुन शेतकऱ्यांचे कमीत-कमी क्षेत्र बाधित होईल, तसेच कामापुरती अर्धवट शेतजमीनी अधिग्रहित न करता शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय घ्यावेत, अशा विशेष सूचना खा. गोडसे यांनी याप्रसंगी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जूनअखेर पर्यन्त या मार्गाचे (Nashik- Pune Semi High Speed Railway) सर्वेक्षण पूर्ण झाल्यांनतर दोन ही प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शेतकरी हिताच्याच रेल्वे मार्गाला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.

या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणात शेतकरी हितालाच अधिकाधिक प्राधान्य देण्यात येईल. देवळाली ते वडगाव या पर्यायी मार्गाचे देखील जूनअखेर पर्यन्त सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यानंतर कमीतकमी शेतकरीऱ्यांचे नुकसान होणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मार्गाला मंजुरी देण्यात येईल. नियोजित मार्गासोबत देवळाली – वडगाव मार्गाचे देखील सर्वेक्षणाच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे – खासदार हेमंत गोडसे, नाशिक