सर्वात वर

४५ वर्षाच्या तरुणासाठी ८५ वर्षाच्या आजोबांनी दिला आपला स्वतःचा ऑक्सिजन बेड

नाशिक – कोरोनाच्या महामारीने देशासह राज्यात थैमान घातले आहे.दररोजच्या रुग्णसंख्येत हजारोने वाढ होत आहे. कोणाला रेमडिसीवीर मिळत नाही तर अनेकांना ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) मिळत नाही.कोरोना खूप भयंकर गोष्टी दाखवतो आहे,एका ८५ वर्षाच्या आजोबांनी आपला ऑक्सिजन बेड एका ४५ वर्षाच्या तरुणाला देऊन या आजोबांनी या काळात असे विलक्षण काम करून समाजा समोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. 

नागपूरच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्या ८५ वर्षाच्या आजोबांनी ऑक्सिजन लावलेला अशा स्थितीत एक महिला तिच्या चाळीशीतल्या तरुण पतीला ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) मिळण्यासाठी आकांत करताना त्यांनी पाहिलं.त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की मी माझं आयुष्य जगून पूर्ण केलं आहे.हा तरूण जगला पाहिजे.माझा ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) त्याला द्या.असे सांगून त्यांनी या तरुणाला आपला बेड द्यायला लावला. 

त्या आजोबांना नातेवाईकांनी समजवण्याचा प्रयत्न केला,डॉक्टरांनी ही त्या आजोबांना सांगितले तुम्हाला आता उपचार खूप महत्त्वाचे आहे आणि पुन्हा बेड मिळेल का माहित नाही, त्यामुळे हा बेड सोडू नका असा सल्ला ही नातेवाईकांनी दिला.परंतु आजोबांनी मला घरी न्या असाच आग्रह धरला.डॉक्टरांना कन्सेंट लिहून दिला कि आम्ही आमच्या मर्जीने जात आहोत नंतर मुलगी जावयांनी त्यांना घरी आणले आणि तिसऱ्या दिवशी घरीच या आजोबांचे निधन झाले.  

नागपूर मधील इंदिरा गांधी रुग्णालयातील ही घटना असून वय वर्ष ८५ असणाऱ्या त्या आजोबांचे नाव नारायण दाभाडकर असेअसून ते नागपूरला संघ स्वयंसेवक होते, यांचं कोवीडमुळे निधन झालं.मृत्यु हा अटळआहे. मृत्यू येण्याचे प्रत्येकाचे कारणे वेगवेगळी असतील पण काही लोकं मृत्यूसमयी देखील काहीतरी विलक्षण करून जातात.

नारायण दाभाडकर

शिवानी दाणी -वाखारे -नागपूर यांच्या फेसबुक वॉल वरून साभार 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2873350992913037&id=100007144928996