सर्वात वर

शिंगाड्याचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र -१)

डॉ.राहुल रमेश चौधरी 

शिंगाडा पाणथळ जागी उगवणारी एक तृणवर्गीय वनस्पती आहे.(शास्त्रीय नाव: Eleocharis dulcis , इलेओकरिस डल्सिस; इंग्रजीत – water chestnutवॉटर चेस्टनट ) हि वनस्पती जातकरुण पूर्व आशिया ,दक्षिण आशिया,आग्नेय आशियामध्ये मोठयाप्रमाणात आढळते त्याचे पर्णहीन देठ सुमारे १.५ मीटर उंचीपर्यंत वाढतात. २ सेंटीमीटर जाडीचे मऊ गर असलेल्या शिंगाड्याच्या फळाची चव किंचित गोड असते.अनेक संस्कृत्यांमध्ये याचे कंद खाद्य समजले जातात.शिंगाड्यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. भारतात शिंगाड्याची शेती उत्तर भारतात व विदर्भात मोठ्या प्रमाणावर केली जाते.पूर्व विदर्भात व मध्यप्रदेशात अनेक तलाव आहेत. तेथेही याची शेती केली जाते. 

१.रोजच्या रुग्ण तपासणीत उपवासाबद्दल प्रश्न विचारले असता रुग्णाचा हमखास येणारा प्रश्न….उपवासात साबुदाणा नाही तर काय खायचे ? याकरीता आपण आज त्याला असलेल्या पर्यायांपैकी एक आणि दैनंदिन आहारात वापरता येण्याजोगा पदार्थ शिंगाडा बाबत थोडकयात पाहूया.

२.शिंगाड्याचे पीठ्याचे थालीपीठ,लाडू,शीरा,हलवा,पुऱ्या,तूपात परतून किस,समोसे,चाट,भाकरी असे एकाहून एक रुचकर पदार्थ करता येतात. आधुनिक भाषेत सांगायचे तर भरपूर पोषणमूल्ये ,क्मी कॅलरी आणि कमी फॅट असलेले हा कंद पदार्थ होय.

३.आयुर्वेदानुसार पाने,फुले,फळे,देठ,कंदमुळे,छत्रशाक(मश्रूम) हे उत्तरोत्तर गुरु असत्तात,त्यापैकि शिंगाडा हा कंदमूळात मोडणारा पदार्थ.

४.भरपूर calcium,iron असलेल्या हा शिंगाडा जे vitamin शरीरात साठवून ठेवावे लागतात अश्या vit D,vit E याने श्रींमत आहे,तसेच vit B वर्ग अगदी B1 पासून ते  vit B12 पर्यंत यात भरपूर प्रमाणात सापडतात. 

५.आयुर्वेदानुसार वेगवेगळे संदर्भ काढून पाहीले असता वारंवार होणारे गर्भपात पश्चात वापर,मुखरोग,शिरोरोग ,रक्तपित्त,उतार वयातील  दातांच्या विकारात याठिकाणी याचा उपयोग दिसून येतो.

कसा आणि कुठे वापर करणार ?

१.ज्यांना अम्लपित वारंवार होते अश्यांनाशिंगाडा पीठ १ चमचा त्यात दूध १ कप आणि १ कप पाणी असे मिळून खीर करावी त्यात चवीप्रमाणे खडीसाखार टाकावी.पित्ताच्या घेत असलेल्या औषधासोबत वापर केल्यास उत्तम गुण.

२.पित्ताच्या त्रासामूळे सारखी भूक लागणाऱ्या रुग्णांना शिंगाडा पीठ शीरा व म्हशीचे दूध यासह घ्यावा.

३.लोह व रक्ताची कमतरता असलेल्या रुग्णांनी १ चमचा शिंगाडा पीठ व १ खजूर व तूप असे परतून त्याची गोळी करावी व त्याचा रस गिळावा.नंतर १ तासापर्यंत काहीही खावू नये.

४.लहान मुले जेवत नाही,केक-बिस्किटे-चॉकलेट खातात,मुलांचे वजन वाढत नाही ,बुद्धी कमी असणे अश्या तक्रारी करणाऱ्या पालकांसाठी शिंगाडा म्ह्णजे वरदानच.

५. गर्भापात झाल्यानंतर होणाऱ्या वातविकारात तसेच सहाव्या,सातव्या महिन्यात गर्भाचे पोषण होण्याकरीता ,प्रसूतीनंतर योग्य प्रमाणात दूध येणेसाठी शिंगाडा वापरावा.

६.मैथुन ईच्छा कमी होणे,संभोग पश्चात थकवा जाणवने,मन उदास राहणे,भीती,उद्विग्नता,चिडचिडेपणा,थकवा अश्या तक्रारींमध्ये शिंगाडा पीठ ,उडीद थोडे,जायफळ,केशर,दूधाची साय याची खीर करावी व ती चांगली भूक लागल्यावर घ्यावी.
७.डोळ्यांची आग होणे,लालीमा येणे,दुखणे या तक्रारींवर शिंगाडा पीठ तूपात पर्तून घ्यावे.

८.शौचाला साफ न होणे,आंबूस वास येणे,पातळ भसरट होणे अश्या वेळेला शिंगाडा भाकरी व मसूर कढण द्यावे 

सावधान !!!! 

१.शिंगाडे हे गुणांनी थंड,जड,कोरडे,स्तंभक आहेत.

२.मलावरोध असताना मळ खडा होणे,पसरट,चिकट,पातळ होणे अश्या अवस्थेत शिंगाडा वापरू नये.

३.भूक नसतांना शिंगाडे खावू नये.

४.कच्चे ,अर्धवट शिजवलेले,अर्धवट वाफवलेले शिंगाडे खावू नये.

५.खावून लगेच पाणी पिऊन  झोपू नये.

६.विशेषत: याचा प्रयोग करतांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,सोबत तीव्र आजार असतांना औषधे घ्यावीत,

Dr-Rahul-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी 

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय  मोबाईल  -९०९६११५९३०