सर्वात वर

विवाहानंतर पत्नीचं परपुरुषावर जडलं प्रेम : बिहार मध्ये पतीनेच लावून दिले पत्नीचे लग्न

“हम दिल दे चुके सनम”चित्रपटा सारखी कथा प्रत्यक्षात घडते तेव्हा … 

पटना –सलमान खान ऐश्वर्या राय आणि अजय देवगणचा “हम दिल दे चुके सनम” (Hum Dil De Chuke Sanam) हा चित्रपट बहुतेक सर्वानीच पहिला असेल या चित्रपटात लग्नानंतर अजय देवगणने त्याची पत्नी ऐश्वर्या रायला तिचा प्रियकर सलमान खानची भेट घडवून आणण्यासाठी तो विदेशात घेऊन जातो.अश्या घटना चित्रपटात बघायला मिळाल्या आहेत.पण अशीच एक  घटना बिहार मधील भागलपूर मधील सुल्तानगंजमध्ये घडली आहे. 

विवाहाला सात वर्ष होऊन गेल्यावर दोन मुलांच्या आईला एका परपुरुषावर प्रेम झाले. नवऱ्याला हे समजल्या नंतर त्याने त्या पुरुषाशी आपल्या बायकोचे चक्क लग्न लावून दिले.(The Husband Arranged The Wife’s Marriage) याबाबत समजलेली माहिती अशी की  खगडिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या सपना कुमारी या महिलेचं सात वर्षांपूर्वी सुल्तानगंज याठिकाणी राहणाऱ्या उत्तम मंडल याच्याशी झालं होतं. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. पण कालांतराने संबंधित विवाहित महिलेचं नात्यातील एका अन्य युवकावर प्रेम झालं. त्यानंतर त्यांची जवळीक आणखी वाढत गेली.काही काळ पतीने या गोष्टींना विरोध केला.परंतु पत्नी एकाच्या मनस्थितीत नव्हती त्यामुळे पत्नीच्या हट्टासमोर पतीनं चक्क गुडघे टेकून तिच्या दुसऱ्या लग्नाला सहमती दिली आहे. त्याने राजू कुमार नावाच्या आपल्या नात्यातील प्रियकर युवकासोबत पत्नीचे लग्न लावून दिलं आहे.(The Husband Arranged The Wife’s Marriage)

या विवाहाची बातमी समजतात अनेकांनी गर्दी केली होती सुल्तानगंज येथील दुर्गा मंदिरात झालेल्या या विवाह सोहळ्याला  दोन्ही बाजूच्या परिवाराने उपस्थिती लावली   होती. यावेळी संबंधित महिलेची दोन मुले हीया विवाह सोहळ्यात उपस्थित होते. तर नवऱ्याच्या डोळ्यात अश्रूही होते. पण त्याने आपल्या बायकोवरील  प्रेमामुळे  त्याग करून तिचं लग्न परपुरुषासोबत लावून दिलं (The Husband Arranged The Wife’s Marriage) आहे. अशा पद्धतीचं लग्न गावातील मंदिरात होतं असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.  यावेळी पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला आशीर्वाद देखील दिले आहेत.