सर्वात वर

लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवर पुन्हा भेटीला येणार लोकप्रिय मालिका

पुन्हा एकदा बहरणार प्रेमाचे रंग  

मुंबई – खास लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवरील (Star Pravah) लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. ही मालिका २ मे पासून सुरु होणार असून दर रविवारी सायंकाळी ६ वाजता ही मालिका रसिकांना पहाता येणार आहे. या मालिकेत स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे यांच्या दमदार अभिनय पुन्हा पहाता यावा अशी मागणी प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते. 

या मालिकेने नुकतीच दोन वर्ष देखिल पूर्ण केली. यानिमित्ताने मालिकेतल्या कलाकारांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करून आपला आनंद व्यक्त केला होता. या व्हिडिओला रसिक प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता शिवाय पुन्हा एकदा ही मालिका पहायला मिळावी अशी मागणी हि रसिकांनी आपल्या कॉमेंट मधून केली होती.त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहाता येणार आहे.

जिवलगा मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. मालिकेचं शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळेच जिवलगा मालिकेच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. तेव्हा तुमच्या जिवलगांसोबत पाहायला विसरु नका स्टार प्रवाहची (Star Pravah) लोकप्रिय मालिका जिवलगा दर रविवारी सायंकाळी ६ वाजता स्टार प्रवाहवर (Star Pravah) रसिकांना बघता येणार आहे.